Sat. Jun 6th, 2020

चक्क 30 रुपयांसाठी तो म्हणाला ‘तलाक तलाक तलाक’ !

पत्नीने भाजीसाठी 30 रुपये मागितल्याने ‘तलाक तलाक तलाक’ म्हणत पतीने भररस्त्यात पत्नीला घटस्फोट दिला. घटस्फोटाची ही घटना दिल्लीच्या ग्रेटर नोएडाच्या दादरी परिसरात घडली आहे.

पत्नीने भाजीसाठी 30 रुपये मागितल्याने ‘तलाक तलाक तलाक’ म्हणत पतीने भररस्त्यात पत्नीला घटस्फोट दिला. घटस्फोटाची ही घटना दिल्लीच्या ग्रेटर नोएडाच्या दादरी परिसरात घडली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी तीन तलाकच्या प्रकरणांवरच विधेयक सादर केले होते. याच पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना हृदयद्रावक आहे.

नेमकं काय घडलं ?

दिल्लीच्या ग्रेटर नोएडाच्या दादरी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने भररस्त्यात त्याच्या पत्नीला तीन वेळा तलाक म्हणत घटस्फोट दिला आहे.तलाक म्हणण्यामागे पत्नीने भाजीसाठी 30 रूपये मागण्याचे शुल्लक कारण होते.

या प्रकरणातील पीडीत महिलेचे नाव जैनब असे असून पतीचे नाव साबिर असे आहे.जैनबने पतिकडे भाजीसाठी 30 रूपये मागितले होते. त्यावर चिडत साबिरने जैनबला मारहाण केली.

मारहाणीविषयी कळताच जैनबचे वडिल जाब विचारण्यासाठी तिथे पोहोचले. परंतु, त्यांनाही न जुमानता पीडीतेच्या वडिलांसमोर भररस्त्यात तलाक, तलाक, तलाक म्हणत तिला घटस्फोट दिला, असा आरोप पीडीतेने केला आहे.

याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीसांनी पतीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. पीडीता जैनबचे 9 वर्षांपूर्वी साबिरशी लग्न झाले होते. लग्नात वेगवेगळ्या वस्तुंसह मोठ्या प्रमाणात हूंडा देखील देण्यात आला होता.

असे असूनही आणखी हूंड्यासाठी पिडीतेचा छळ चालू होता, त्याच तिला जीवे मारण्याची धमकीसुद्धा मिळत होती असे पीडीतेच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

साबिरचे त्याच्या वहिनीशी अनैतिक संबंध असल्याने तो जैनब ला मारहाण करत असल्याचेही तिच्या नातेवाईकांनी म्हटले आहे.

वारंवार घटस्फोटाची मागणी करणाऱ्या साबिरने 30 रूपये मागितल्याच्या कारणाने जैनब ला तीन वेळा तलाक म्हणत त्याने घटस्फोट घेतला.

तीन तलाकच्या बाबतीत काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विधेयक सादर केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *