Sun. Aug 25th, 2019

चेटकिणीने झपाटलंय सांगत विनय’भंग करणाऱ्या भोंदू बाबाला अटक

0Shares

तुला चेटकीणीने झपाटलंय. तुझ्या नवऱ्याचे बाहेर संबंध आहेत. तुझ्या घरच्यांचा तुला त्रास होतोय. असं सांगत महिलांचा विनयभंग करणाऱ्या भोंदू बाबाला खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चंद्रेश नरसी पीर असे या भोंदू बाबाचं नाव असून तो डोंबिवलीत राहतो.

भोंदू बाबाचा गोरखधंदा!

कल्याण पश्चिमेतील कोळवली परिसरातील एका इमारतीत गेल्या काही दिवसांपासून या भोंदू बाबाचा गोरख धंदा सुरू होता.

मोहना येथे राहणारी एक महिला आपल्या चुलत बहिणीसोबत पतपेढीच्या कामासंदर्भात याठिकाणी गेली होती.

त्यावेळी या भोंदू बाबाने ‘तुला चेटकिणीने झपाटलंय. ती मी काढून देतो. तुझ्या नवऱ्याचे बाहेर संबंध आहेत. तुझ्या घरच्या लोकांचा त्रास आहे.’ असं सांगत सिगारेटचा धूर या महिलेच्या चेहऱ्यावर सोडला.

त्यानंतर महिलेला सेंट लावण्याच्या बहाण्याने शरिरावर हात फिरवला.

या महिलेकडे पूजेसाठी 25 हजार रुपये मागत याबाबत कोणाला सांगितल्यास मंत्र-तंत्राने तुमचे नुकसान करू अशी धमकीही दिली.

मात्र त्याला न जुमानता या महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.

त्यानुसार खडकपाडा पोलिसांनी कल्याण पश्चिमेतील कोळवली परिसरात जाऊन पाहणी केली. तेव्हा तेथे पुजेचं साहित्य, टाचण्या, दिवे आदी साहित्य आढळून आलं. तसंच काही नागरिकही आपल्या कौटुंबिक समस्या घेऊन या बाबाकडे आल्याचं दिसलं.

दरम्यान खडकपाडा पोलिसांनी या बाबाला ताब्यात घेत त्याच्यावर विनयभंगासह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट -अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

अशी होती भोंदू बाबाची फसवेगिरी

रिक्षात किंवा बाहेर वावरताना ज्या व्यक्ती आपल्या समस्यांबाबत चर्चा करत असतील अशा लोकांना ते हेरत असे.

त्यांना चेटूक आणि समस्यांची पट्टी पढवत असे.

आपल्या जाळ्यात ओढत असल्याची माहितीही उपायुक्त पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तसेच लोकांनी अशा प्रकारच्या भोंदू बाबांवर अजिबात विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आता या भोंदूबाबावर 354, 506,34 या भारतीय दंड विधान कायद्यासह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट -अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *