Mon. Jul 22nd, 2019

‘चौकीदार’ला आव्हान ‘बेरोजगार’ हार्दिक पटेल यांचं!

0Shares

भाजपने सुरू केलेल्या ‘मै भी चौकीदार’ या हॅशटॅगला Twitter वर चांगला प्रतिसाद मिळतोय.  BJP च्या अनेक नेत्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट्सवर आपल्या नावाआधी ‘चौकीदार’ लिहिलं आहे. आता यालाच प्रत्युत्तर म्हणून गुजरातच्या पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर नावाआधी ‘बेरोजगार’ असं लिहिलं आहे.

काय आहे हे Twitter war?

नरेंद्र मोदींनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटचं नाव बदलून ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ केलंय.

त्यांच्यापाठोपाठ अनेक भाजप मंत्र्यांनीही आपल्या नावापुढे ‘चौकीदार’ असं पद लावलंय.

त्यामुळे ‘चौकीदार’ जोरदार ट्रेण्डिंगमध्ये आलं असून ट्विटरवर ट्रेंड बनला आहे.

गेल्या दोन दिवसांतच पंतप्रधानांच्या ‘मै भी चौकीदार’ हॅशटॅगला आतापर्यंत 15 लाख लोकांनी ट्विट केलं आहे.

काँग्रेसने सुरू केलेला ‘चौकीदार चोर है’ हा हॅशटॅगही चांगलाच ट्रेण्डिंग आहे.

आता यामध्ये गुजरात पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांनीही उडी घेतली आहे.

‘चौकीदार’ला आता ‘बेरोजगार’ या शब्दाने हार्दिक पटेल यांनी आव्हान दिलंय.

त्यांनी आपल्या ट्विटरवरील नावाआधीही ‘बेरोजगार’ असं लिहिलंय.

मोदींनी रोजगारनिर्मितीचं दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नाही. यालाच अनुसरून हा हॅशटॅग सुरू करण्यात आलाय.

या मोहिमेलाही चांगला प्रतिसाद मिळतोय.

हजारो युजर्सनी हार्दिक पटेल यांच्यासोबत आपल्या नावाआधी ‘बेरोजगार’ असं लिहून समर्थन दिलंय.

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: