Health

छातीत दुखल्याने देशमुख रुग्णालयात दाखल

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, छातीत दुखू लागल्याने आणि रक्तदाब देखील जास्त वाढल्याने डॉक्टरांनी देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती आहे. यामुळेच सध्या त्यांना मुंबई येथील केईएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तुरुंगात देशमुख यांना खांदेदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे खांद्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. देशमुख यांना खासगी रुग्णालयात उपचारांची गरज नाही, जेजेतही उपचार होऊ शकतात, असं ईडीनं म्हटलं होतं. देशमुखांनी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली होती, जे.जे. रुग्णालयात सोयी सुविधांचा अभाव असल्याने आणि त्यांचे वाढते वय पाहता खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी देण्यात यावी अशी मागणी देशमुखांनी न्यायालयाकडे केली होती.

मनी लाँड्रिंग प्रकरणात ते सध्या तुरुंगात आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्याविरुद्ध लावलेल्या खंडणी आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांप्रकरणी देशमुख यांना १ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी मार्चमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात सिंह यांनी सचिन वाझे यांना मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगण्यासह अनेक गैरकृत्यांमध्ये देशमुख यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता.

manish tare

Recent Posts

प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

सोलापूर येथील केकडे नगरातील दशरथ नागनाथ नारायणकर या तरूणाचा गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास खुन झाला. प्रियकराच्या…

5 days ago

गॅस वाहतूक करणारा टॅंकर नदीत कोसळला

 मुंबई-गोवा महामार्गावर गुरूवारी दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. एक गॅस कंटनेर थेट पुलावरुन…

6 days ago

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत श्रीकांत शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या…

6 days ago

शिवसेनेचा ‘प्लॅन बी’ तयार

शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेनं शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही…

6 days ago

‘शाहांचा दौरा ठाकरेंना झोंबला’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी गोरेगावच्या नेस्को संकुलात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपावर टीका केली.…

6 days ago

‘ज्यांना जायचे आहे त्यांनी निघून जा’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.…

7 days ago