Sat. Apr 20th, 2019

जय महाराष्ट्र हेडलाईन्स 1.00 PM

54Shares

1.आयएसआयशी संपर्कात असल्याच्या संशयावरून देशभरात एनआयएचे छापे… हैद्राबादमध्ये 3 तर वर्ध्यात एका ठिकाणी छापा…वर्ध्यातून अब्दुल वसिथच्या दुसऱ्या पत्नीला घेतलं ताब्यात…

2.आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका, शरद पवारांचं अकलूजच्या सभेमध्ये मोहिते-पाटलांवर टीकास्त्र
3.निवडणुकीनंतर शरद पवारांना भस्म फासून हिमालयात जावं लागेल… औरंगाबादमधल्या सभेत उद्धव यांची आक्रमक टीका
4.अपयशी लोकप्रतिनिधींमुळेच कोकण पर्यटनात मागास, महाडमधल्या सभेत राज ठाकरेंचा हल्लाबोल… लोकप्रतिनिधी, मंत्र्यांना विचारला जाब..
5.भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य घेतलं मागे, चौफेर टीका झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांचा माफीनामा
6.हळदीच्या पूर्वसंध्येलाच नवरदेवाची गळफास घेत आमहत्या…नाशिकच्या सातपूरमधील धक्कादायक घटना…लग्नसमारंभापूर्वीच दोन्ही कुटुंबावर शोककळा…
7.काश्मीरमधील चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा…कारवाईदरम्यान शस्त्रसाठाही जप्त…दहशतवाद्याची ओळख पटवण्याचं काम सुरु…
8.सायन उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी आजपासून 20 जूनपर्यंत राहणार बंद, दुरुस्तीच्या काळात वाहतूक वळवली जाणार पर्यायी मार्गावरून..
9.पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, उत्तर प्रदेशाच्या कानपुर रुमा गावाजवळील घटना, हावडाहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनला अपघात
10.आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध रंगणार मुंबई इंडियन्स सामना, विजयासाठी दोन्ही संघात चुरस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *