Fri. Jun 18th, 2021

जय महाराष्ट्र हेडलाईन्स 2.00 pm

जय महाराष्ट्र हेडलाईन्स 2.00 pm
1.मुख्यमंत्र्यांसमोरच अहमदनगरमधल्या भाजप पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी… विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याची मागणी…
2.पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक… माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठक… विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह माढ्यामधले महत्त्वाचे नेते उपस्थित…
3.बहुजन वंचित आघाडीचं काँग्रेसवर दबावतंत्र, प्रकाश आंबेडकर सोलापुरातून सुशीलकुमार शिंदेविरोधात निवडणूक लढवण्याची चर्चा
4.मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांची ‘घरवापसी’, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये करणार पक्ष प्रवेश
5. येवल्यात राष्ट्रवादीचं रास्ता रोको आंदोलन….कालव्यात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको
6. राज्यभरात ठिकठिकाणी दुष्काळामुळे पाणी टंचाईच्या झळा… शेतकऱ्यांसह सामान्यही हवालदिल…
7.ईगतपुरीच्या आशाकिरणवाडीत बिबट्याचा 6 जणांवर हल्ला, हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी, जखमींवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
8.आईसोबत चालती ट्रेन पकडणारी चिमुरडी अडकली गाडीखाली… सहप्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे मुलीला वाचवण्यात यश… मनमाड स्टेशनवरील घटना
9.काश्मीरमधल्या फुटीरतावादी नेत्यांना NIA चं समन्स… दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या आरोपावरुन मिरवाईज उमर फारुखसह इतर नेत्यांना चौकशीसाठी बोलवलं
10.दिल्लीत पद्म पुरस्कारांचं वितरण… दिग्दर्शक वामन केंद्रे, अभिनेते मनोज वाजपेयी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *