Tue. Jun 18th, 2019

जय महाराष्ट्र हेडलाईन्स 6.30 PM

28Shares
1) कराडमध्ये विवाहित मुलीसह आई-वडिलांची आत्महत्या, आत्महत्येचं कारण अस्पष्ट.. विद्यानगरमधल्या गुरुदत्त कॉलनीतली घटना
2) यवतमाळमध्ये हैद्राबाद-नागपूर महामार्गावर कार आणि रिक्षाची भीषण धडक..5 जण ठार तर 12 जण जखमी
3) बुलडाण्यातल्या सोनाटीमध्ये बापलेकाची निर्घृण हत्या..क्षुल्लक कारणावरून नातेवाईकांनीच केली हत्या
4) नाशिकमध्ये दुचाकी टो करुन नेल्यानं वाहतूक शाखेच्या कार्यालयात तरुणाचा अर्धनग्न होत धिंगाणा…तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.
5) राजकीय पक्षांनी निवडणूक बॉण्डच्या माध्यमातून मिळालेल्या देणग्यांची माहिती 30 मेपर्यंत निवडणूक आयोगाला सादर करावी..सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश…
6) शरद पवारांनी पक्षाचं नाव राष्ट्रवादी ठेवून जनतेची दिशाभूल केली…पंतप्रधान मोदींचा पवारांवर हल्लाबोल
7) राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला तूर्तास विराम…राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्येच राहणार…नगरमधील मोदींच्या सभेत विखेंचा भाजपाप्रवेश नाही…
8) काँग्रेसची भाषणं काल्पनिक आणि मनोरंजनात्मक…गरिबांना 72 हजार रुपये देण्याच्या राहुल गांधींच्या घोषणेवर मुख्यमंत्र्यांची टीका
9) रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर… भारत-रशियातील संबंध मजबूत करण्यासाठी मोदींना सेंट अँड्रयू पुरस्कार
10) आयपीएलमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्ससमोर दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान… घरच्या मैदानावर खेळणाऱ्या कोलकात्याला पराभवाची परतफेड करण्याची संधी…

जय महाराष्ट्र हेडलाईन्स 2.00 PM

1.राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला तूर्तास विराम…राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्येच राहणार…नगरमधील मोदींच्या सभेत विखेंचा भाजपाप्रवेश नाही…
2.सुजय विखेंच्या माध्यमातून काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राइक केल्याचा मुख्यममंत्र्यांचा दावा तर दिलीप गांधींचीही मनधऱणी करण्याचा केला प्रयत्न…
3.पवारांनी पक्षाचं नाव राष्ट्रवादी ठेवून जनतेची दिशाभूल केली…पंतप्रधान मोदींची शरद पवारांवर पुन्हा एकदा टीका…
4.राज ठाकरे नांदेडमध्ये पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत… आज दिवसभर नांदेडमध्ये विविध कार्यक्रम, संध्याकाळी जाहीर सभा
5.भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांची राहुल गांधी यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव… राहुल यांनी सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप…
6.ब्रीचकँडीमधील टाटा गार्डन नामशेष होणार असल्याने कोस्टल रोडचे काम थांबवण्याचे कोर्टाचे आदेश..पुढील सुनावणी 23 एप्रिलला
7.जेट एअरवेजची आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं रद्द… देशांतर्गतही मोजकीच उड्डाणं सुरू… प्रवाशांना सहन करावा लागतोय नाहक त्रास…
8.रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळणार अवघ्या 49 पैशांत 10 लाखांचा विमा..आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून तिकीट बुक करणाऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ..
9.मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये तब्बल 71 हजार मुले बेघर… खासगी संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आली बाब… बेघर मुलांसमोर शारिरीक आणि मानसिक शोषणाची मोठी समस्या..
10.शिर्डीतील साईबाबांच्या रामनवमी उत्सवाला पहाटेच्या काकड आरतीने सुरुवात…देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक शिर्डीत जमण्यास सुरुवात

28Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *