Jaimaharashtra news

ठाण्यात ‘जय श्री राम’ न म्हटल्यानं रिक्षा चालकास मारहाण

पश्चिम बंगाल मध्ये सुरू असणारा जय श्री राम चा वाद आता मुंबईतही पोहोचला आहे. ठाण्यातील मुंब्रा भागात एका टॅक्सी ड्रायव्हरला जय श्रीरामच्या घोषणा देण्याची सक्ती करत मारहाण करण्यात आली आहे. या टॅक्सी ड्राव्हरला तिघांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी त्याने पोलिसात तक्रार दाखल केली असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

ठाण्यातल्या मुंब्रा भागात फैसल या टॅक्सी ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली आहे.

तिघांनी फैसल याला मारहाण केली असून मारहाण करत जय श्रीरामच्या घोषणा देण्याची सक्ती केली.

फैसलने त्याला मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून अशा प्रकारांमध्ये वाढ झाली आहे.

तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पश्चिम बंगाल मध्ये सुरू असणारा जय श्री राम चा वाद आता मुंबईतही पोहोचला आहे.

Exit mobile version