जेव्हा छ. उदयनराजे गाणं गातात…

छत्रपती खा. उदयनराजेंचे फॅन महाराष्ट्रभरात आहेत. त्यांची प्रत्येक गोष्ट आणि किस्से मोठ्या आवडीने ऐकले जातात. परंतु खा. छत्रपती उदयनराजेंनी गायलेलं गाणं कधी ऐकलंय का? छत्रपती उदयनराजेंनी चक्क गाण गायलंय तेही उपस्थित सातारकरांकरीता…
“हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते” हे किशोर कुमार गाणं उदयनराजेंनी नगरपालिकेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात भाषण करताना गायलं.
खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उपस्थितांसाठी गाणं गायलं आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.