Jaimaharashtra news

#जोश निवडणुकीचा : विविध रंगाचे वाहन परवाने !

निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांकडून वाहानांचा वापर करण्यात येत असतो. या प्रचार रॅलीत विनापरवाना वाहनांचा वापर होऊ नये, याकरीता ठाणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या लोकसभा क्षेत्रातील विधानसभा निहाय विविध रंगाचे वाहन परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. देण्यात आलेला रंगीत परवानाच ग्राह्य धरण्यात येणार असून तो वाहनाच्या दर्शनी भागात लावणंही बंधनकारक असणार आहे. तसंच रंगीत परवान्याऐवजी छायांकित परवाना प्रत लावल्यास वाहन जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा ठाणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिला.

 

ठाणे लोकसभा मतदार संघासाठी 29 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.

त्यात झालेल्या अर्ज छाननी प्रक्रियेत 25 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.

प्रचारसभांसह प्रचार रॅली देखिल मोठ्या प्रमाणात सुरु होणार आहे.

या प्रचारासाठी वापरण्यात येणार्‍या वाहनासाठी नवडणूक विभागाकडून परवानगी घेणं बंधनकारक असतं.

त्यानुसार ठाणे लोकसभा क्षेत्रातील शिवसेना-भाजपयुतीचे उमेदवार राजन विचारे व राष्ट्रवादी कॉग्रेसने तीन वाहन परवान्यांसाठी अर्ज केले आहेत.

त्यापैकी काही वाहनांची परवानगी निवडणुक विभागाकडून देण्यात आली.

निवडणूक विभागाकडून परवानगी देण्यात आलेल्या वाहनांव्यतिरिक्त अतिरीक्त वाहने प्रचारासाठी वापरली जात असल्याच्या तक्रारी निवडणूक विभागाकडे येत असतात.

त्यामुळे यंदा परवान्याव्यरिक्त अन्य वाहनांचा वापर होऊ नये यासाठी निवडणुक विभागाने ठाणे लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या रंगांचे प्रचार वाहन परवाने देण्यात आले आहे.

 

विधानमतदारसंघ – रंग

मिरा-भाईंदर         –  निळा

ओवळा-माजिवाडा – हिरवा

कोपरी-पाचपखाडी – फिक्कट तपकीरी

ठाणे – नारंगी

ऐरोली  – लाल

बेलापूर – पिवळा

 

Exit mobile version