Sat. May 25th, 2019

ट्रम्प सरकारच्या ‘या’ निर्णयाने पाकिस्तानला जोरदार झटका!

0Shares

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय. पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणारी सैनिकी मदत थांबवण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतलाय. अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारी ही मदत हा भारतासाठी चिंतेचा विषय होता. मात्र ही मदत अमेरिकेने थांबवल्यामुळे हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडणार आहे. पाकिस्तानला मात्र या गोष्टीमुळे जोरदार झटका बसलाय.

यापूर्वीही ट्रम्प सरकारने पाकिस्तान मिळणारा निधी कमी करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र आता पाकिस्ताना दिली जाणारी मदतच बंद करण्यात आली आहे. अमेरिका पाकिस्तानला दरवर्षी 1.3 अब्ज डॉलर्सचा निधी सैन्य मदतीसाठी पुरवते. पण यापुढे ही मदत पाकिस्तानला मिळणार नाही. त्यामुळे पाकिस्तानवर मात्र भीषण परिस्थिती ओढावणार आहे. ट्रम्प यांनी अचानक हा निर्णय घेण्यामागे कारण मात्र ओसामा बिन लादेनचं दिलं आहे.

‘ओसामा बिन लादेन पाकिस्तानच्या सैनिकी तळाजवळच सापडला होता. पाकिस्तानात सर्वांना तो कुठे राहतो हे माहीत होतं. पाकिस्तानात त्याची चांगली बडदास्त ठेवली जात होती. याच पाकिस्तानला आपण पाठिंबा देत असतो आणि दरवर्षी सैनिकी मदत म्हणून 1.3 अब्ज डॉलर्स देत असतो. पाकिस्तानने मात्र अमेरिकेसाठी काहीच केलं नाही. म्हणून यापुढे सैनिकी मदत निधी पाकिस्तानला थांबवण्यात येईल.’ असं ट्रम्प यांनी जाहीर केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *