Tue. Sep 28th, 2021

डॉ. आंबेडकरांची शिकवण सार्थ ठरवणाऱ्या शिक्षकाची प्रेरणादायी कथा!

‘शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा’ ही बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण सार्थ ठरवण्यासाठी वर्ध्यात एका तरुण शिक्षकाची धडपड सुरू आहे. नामवंत विद्यापीठांमध्ये सर्वसामान्य, गरीब आणि होतकरू विद्यार्थी शिकले पाहिजे, यासाठी हा शिक्षक प्रयत्न करीत आहे. विद्यार्थीदशेतून शिकवणी घेत शिक्षक बनणाऱ्या या शिक्षकाची पहिली पायरी आंबेडकरी चळवळ ही होती. ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी विद्यापीठाची प्रवेश परीक्षा पास व्हावे यासाठी हा शिक्षक प्रयत्न करीत आहे .

कोण आहेत अनुपकुमार?

मूळचे उत्तर प्रदेशातील अनुपकुमार सध्या वर्ध्यात स्थायिक झाले आहेत.

त्यांनी JNU मधून आपलं शिक्षण पूर्ण केलं.

आंबेडकरी चळवळीला पुढे नेण्यात त्यांचं योगदान आहे.

बऱ्याचदा ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी विद्यापीठातील उच्च शिक्षण पूर्ण करू शकत नाही.

ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचण येते, त्या विद्यार्थ्यांसाठी अनुपकुमार हे पुढाकार घेतात.

त्या गरजू आणि होतकरू विद्यार्थ्याला आपल्या सावंगी मेघे येथील नालंदा अकॅडमी मध्ये घेऊन जातात.

येथे विदयार्थी तयार होतो तो विविध अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षाही देतो आणि उत्तीर्ण देखील होतो.

पण अनुपकुमार यांची विशेषतः म्हणजे ते त्यासाठी कुठलेही शुल्क आकारत नाही.

सामाजिक शिक्षणच्या दृष्टीने होणाऱ्या अभ्यासक्रमासाठी त्यांची ही शिकवणी चालते.

बी ए तसेच एम ए झालेल्या विदयार्थ्यांना एम फील अथवा पी एच डी सारखे उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांच्यासाठी त्यांचा हा प्रयत्न उपयुक्त ठरत आहे.

सुरवातीला अनुपकुमार यांनी बौद्ध विहारात जाऊन गरजू विद्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर त्यांनी शिकवणी साठी सावंगी जवळील भीम नगर येथील जागा निवडली.

वर्धा जिल्ह्यातूनच नाही तर जिल्ह्याबाहेरून देखील विद्यार्थी त्यांच्या या समाजपयोगी अभियानात सामील झाले आहेत.

शिक्षणासाठी असलेल्या या समाजपयोगी उपक्रमाला समाजातून मदतही मिळतेय.

अशात आता या उपक्रमाचा लाभही विद्यार्थ्यांना होत आहे.

अनेक नामवंत विद्यापीठात विद्यार्थी पोहचले आहेत.

सुमारे अडीचशे विद्यार्थी अनुपकुमार यांचेकडून शिकवणी घेऊन बाहेर पडले आहे.

अनुपकुमार यांच्या या प्रयत्नामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे भलेच झाले आहे. आंबेडकरांच्या शिकवणी प्रमाणे सर्वांना शिक्षण यासाठीची ही धडपड कौतुकास्पद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *