Sat. Jul 2nd, 2022

डॉ. आंबेडकर जयंती : जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचं लेझीम नृत्य!

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनदेखील या मिरवणुकीत लेझीम खेळतांना पाहायला मिळाले. इतकंच नव्हे तर या मिरवणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रथाची धुरा देखील गिरीश महाजन यांनी यावेळी सांभाळल्याचे बघायला मिळालं. यावेळी  या आनंदाच्या क्षणांना कॅमेऱ्यात टिपण्यासाठी गिरीश महाजन यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही त्यांनी गर्दीत एक सेल्फीसुद्धा घेतला.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती त्यानिमित्त संपूर्ण देशभर कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं.

जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर येथे दरवर्षी भव्य मिरवणूक काढली जाते.

गेल्या अनेक दशकांपासून ही परंपरा अखंडपणे चालू आहे.

संकटमोचन म्हणून ख्याती असणारे भाजपचे नेते जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा हा मतदारसंघ आहे.

मंत्रीपद येण्याआधीपासून गेले  26 वर्षापासून आपल्या मतदारसंघात म्हणजेच जामनेर शहरात आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकी मध्ये सहभागी होतात.

या मिरवणुकी मध्ये ते केवळ सहभागीच होतात असे नव्हे तर त्यात लेझीम च्या तालावर सबंध मिरवणूक भर नाचतातदेखील.

मंत्रीपद मिळाल्यावरदेखील त्यांनी आपली ही परंपरा कायम ठेवली आहे.

जामनेर शहरात ‘जयभीम नगर’हून निघालेल्या मिरवणुकीत निळा शर्ट परिधान करून मोठ्या उत्साहाने गिरीश महाजन कार्यकर्त्यांसोबत लेझीमच्या तालावर नाचत होते.

 

यावेळी आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थिताना शुभेच्छा देखील दिल्या.

इतकंच नव्हे, तर या मिरवणुकीमध्ये असलेल्या ट्रॅक्टरवरील रथाची धुरा स्वतः गिरीश महाजन यांनी सांभाळली होती.

ट्रॅक्टर रथही गिरीश महाजन चालवत होते.

नुकत्याच अमळनेर येथे भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डी एस पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये व्यासपीठावर सुरू झालेले संग्राम सोडवण्यासाठी जलसंपदामंत्री पुढे आले.

भाजपच्या अनेक निवडणुका आणि मोठ्या निर्णयांमध्ये गिरीश महाजन यांचा मोठा वाटा असतो.

आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य मिरवणुकीमध्ये आपल्‍या मतदारसंघामध्ये गिरीश महाजन यांनी मिरवणुकीच्या रथाची धुरा सांभाळली.

तल्लीन होऊन लेझीम खेळण्याचा आनंद घेतला.

महाजन यांच्या शिट्टीच्या तालावरती मिरवणुकीतील तरुण भीम पुत्रांनी आपला लेझीम नृत्याचा ठेका बदलला.

यावेळी गिरीश महाजन यांना सेल्फी घेण्याचा मोह देखील आवरता आला नाही.

गर्दीमध्ये सर्वांसोबत गिरीश महाजन यांनी एक सेल्फी सुद्धा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.