Jaimaharashtra news

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: वकील संजीव पुनाळेकर यांना अटक

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी CBI ने संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांना अटक केली आहे. मुंबईतून या दोघांना अटक करण्यात आली असून दोघांनाही पुण्यात नेण्यात येत आहे. रविवारी पुणे  विशेष कोर्टात दोन्ही जणांना हजर करण्यात येणार आहे.
दोघांनाही CBI कोठडीची मागणी CBI चे वकील करणार आहेत. संजीव पुनाळेकर यांनी सनातन संस्थेच्या अटक केलेल्या अनेक आऱोपींच वकीलपत्र घेतलं होत. नरेद्र दाभोळकर यांच्या हत्येत सहभागी झालेल्यांच जाहीर समर्थन पुनाळेकर यांनी न्यूज चॅनेलच्या डिबेटमध्ये केलं होतं. पुनाळेकर यांच्यावर दाभोळकरांच्या हत्येच्या कटात सहभागी होणे, आरोपींना मार्गदर्शन करणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत.

संजीव पुनाळेकरांवर  कुठले आरोप आहेत?

दाभोळकरांची हत्या  केल्यानंतर पुरावे नष्ट करणे
हत्येच्या कटामध्ये सहभाग
आरोपींना मार्गदर्शन करणे

 

विक्रम भावेवर कुठले आरोप आहेत? 

दाभोळकरांची ओळख पटवणे
दाभोलकर कोण होते याची माहिती देणे
कटात सहभाग
Exit mobile version