Wed. May 19th, 2021

तिन्ही सेनादलांची संयुक्त पत्रकार परिषद, पाकविरुद्ध पुरावे सादर

भारत पाकिस्तानदरम्यान सुरू असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज तिन्ही सेनादलांतर्फे संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत तिन्ही सेनादलं पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला तोंड द्यायला सज्ज असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. तसंच पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्याचे पुरावेही सादर करण्यात आले.

 

काय स्पष्ट केलं पत्रकार परिषदेत?

27 फेब्रुवारीला पाक विमान भारताच्या हद्दीत आलं.

भारतीय लषकरी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तान करत होता.

पाकिस्तानचा बॉम्ब हल्ला झाला.

मात्र कोणतंही नुकसान झालं नाही.

पाकच्या विमानाने लष्करी तळावर हल्ला केला

आम्ही तातडीनं त्यांना पिटाळून लावला

पाकिस्तानच्या कारवाया आम्ही हाणून पाडल्या.

हल्ल्याबाबत पाकिस्तान खोटं बोलत आहे.

आम्ही सर्व सिमावर्ती भागात हाय अलर्ट ठेवलाय

लष्कर सज्ज आहे. कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत

जल, थल आणि वायूसेवा सज्ज आहे

आम्ही जमीन, हवेत, पाण्यात लढण्यासाठी सज्ज आहोत.

आमची लढाई दहशतवाद्यांशी आहे

दहशतवाद्यांना जोपर्यंत पाक पाठिंबा देईल

तोपर्यंत आम्ही त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करू

पाकमधल्या दहशतवादी तळावर हल्यामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालय

पाकिस्तानने गेल्या 48 तासांत 35 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे.

पाकला काय पाहिजे हे त्यांनी ठरवलं पाहिजे.

पाकविरोधात पुरावे सादर

एफ-16 हॅमरॅग मिसाईल घेऊन उडू शकते

मात्र या मिसाईलचे तुकडे काश्मीरमध्ये सापडले

याचा अर्थ पाकने एफ-16 विमानाचा वापर केला होता

एफ-16 विमानांचा वापर झाला

पाकमध्ये पडलेल्या विमानाचे अवशेष दाखवले

आमच्याकडे पुरावे आहेत

बालाकोटमध्ये मोठी हानी झालेली आहे

आता सरकारवर अवलंबून आहे की हे पुरावे जगापुढे आणायचे की नाही

भारताने पाकच्या कुरापतीचे पुरावे दाखवले


विंग कमांडर अभिनंदन परतणार याचा आनंद

आम्ही आनंदी आहोत

आमचा वैमानिक मायदेशी परतोय

तो परतल्यानंतर आम्ही स्टेटमेंट करू

जिनेवा संधीनुसार ही सुटका झाली आहे

त्याचे पुरावे आमच्याकडे आहे

सरकारने ठरवल्यानंतर बालाकोट हल्याचे पुरावे आम्ही उघड करु.

सेनादलाने पत्रकार परिषदेत पुरावे सादर केले आहेत. येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला आम्ही सज्ज आहोत. पाकने कारवाई करावी, अन्यथा आम्ही दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करत राहू असा इशाराही पाकिस्तानला देण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *