Tue. Aug 3rd, 2021

#WORLDTHEATREDAY : ‘रंगभूमी आणि आम्ही’!

जोपर्यंत रंगभूमीवर अवतरत नाही, तोपर्यंत कोणतीही संहिता ही नाटक म्हणून मान्यता पावत नाही. ती साहित्यकृती म्हणूनच राहते.  शब्दबद्ध केलेली स्क्रीप्ट या अखंड तालमींमधून बहरत जाऊन कलाकारंच्यामार्फत रंगभूमीवर पोहोचते. लिखाण, दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, ध्वनीसंयोजन या सगळ्यांचा मिलाफ होऊन नाटक जन्माला येतं आणि प्रेक्षकांची दाद मिळवतं.

याच नाटकाचा.. या रंगभूमीचा आजचा दिवस हा जागतिक पातळीवर साजरा केला जातो.

नाटक ही ग्रीक संस्कृतीतून आलेली संकल्पना मानली जाते. भारतामध्ये सर्वात पहिलं नाटक हे बुद्धचरित मानलं जातं. हे नाटक अश्वघोषाने दुसऱ्या शतकाच्या सुमारास लिहिलं असल्याची मान्यता आहे. नाटकाला पाचवा वेदही मानलं जातं. भारतीय नाट्यक्षेत्राला ‘मार्गदर्शक’ ठरणारा ग्रंथ म्हणजे भर्तृहरीने रचलेला ‘नाट्यशास्त्र’…

ग्रीक रंगभूमीप्रमाणेच संस्कृत रंगभूमीलाही देदीप्यमान इतिहास आहे.

संस्कृत नाटकं, पौराणिक नाटकं, फार्स, संगीत नाटक, एकपात्री, विनोदी, गंभीर, स्त्रीवादी, रोमॅंटीक अशा विविध पैलूतून नाटक आत्तापर्यंत रसिकांचे मनोरंजन करत आले आहे.

नाटकाला जागतिक पातळीवर संपन्न करण्यामध्ये ऐतिहासिक नाटकांचे फार मोठे योगदान आहे.

इंग्रजी साहित्यातच नव्हे, तर जागतिक पातळीवर विल्यम शेक्सपिअर हे नाट्यविश्वातील अजरामर नाव ठरलं आहे.

१५८५ पासून शेक्सपिअर यांनी नाट्यक्षेत्रात आपलं योगदान दिलं आहे.

शोकांतिका रचण्यात त्यांचा हातखंडा होता.

शेक्सपिअरने सुमारे 500 वर्षांपूर्वी लिहिलेल्या संहिता आजही जगभरातील विविध नाट्यगृहांमध्ये अव्याहत सुरू आहेत.

रोमिओ-ज्युलियट, मॅकबेथ, हॅम्लेट, मिडसमर नाइट्स ड्रीम, द मेरी वाइव्ह्‌ज ऑफ विंडसर, द विंटर्स टेल, ज्यूलियस सीझर, ओथेल्लो यांसारख्या नाटकांचे जगभरात लाखो प्रयोग आत्तापर्यंत झाले आहेत.

मराठी रंगभूमी

मराठी नाटकाचा आणि रंगभूमीचा प्रारंभ हा विष्णुदास भावे यांनी केला.

१८४३ च्या दरम्यान मराठी रंगभूमीला संघटित स्वरूप नव्हते.

बाहुल्यांचे खेळ, दशावतार, तमाशा, कीर्तन, गोंधळ यासारखे कलाप्रकार जनमानसात रूढ होती.

त्यानंतर कालांतराने त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. ते मूर्त स्वरूप म्हणजे नाटक.

अगदी हलक्याफुलक्या विषयांपासून ते गंभीर विषयाचा नाटकांच्या कथानकावर प्रभाव पडत गेला.

नवनवीन विषय हाताळत असताना नाटकाने नवनवीन उपक्रमही अंगिकारले. सामाजिक स्थितींचा परामर्श त्यातून होत गेला.

आजमीतीला मराठी रंगभूमी ही भारतातील एकमेव यशस्वी व्यावसायिक रंगभूमी आहे.

दरवर्षी सुमारे 200 नाटकं नव्याने मराठी रंगभूमीवर येतात आणि या नाटकांचे शेकडो प्रयोग होत असतात.

महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांना महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळतो.

प्रशांत दामले या रंगभूमीवरील सुपरस्टारच्या नावावर 10000 हून अधिक नाट्यप्रयोग केल्याचे तसेच विविध नाटकांचे विविध ठिकाणी दिवसाला 5 प्रयोग केल्याचा विश्वविक्रम नोंदवण्यात आलाय.

अभिनेते सुनील बर्वे हे टीव्ही, सिनेमा क्षेत्रामध्ये आघाडीवर असतानाही आपल्या ‘सुबक’ संस्थेतर्फे ‘हर्बेरीअम’ सारखे स्तुत्य उपक्रम मराठी रंगभूमीवर राबवत आहेत.

 

रंगभूमी ही नदीप्रमाणे अविरत आहे- सुनिल बर्वे

रंगभूमी ही नदीप्रमाणे अविरत आहे. ती नदीसारखीच चिरंतन वाहात राहावी.

आत्तापर्यंत रंगभूमीवर नेपथ्यापासून रंगभूषेपर्यंत विविध प्रयोग होत आहेत.

नवनवीन टेक्नॉलिजी मुळे जगभरात उपक्रम होत आहेत, त्यामुळे जागतिक रंगभूमी ही जास्त समृद्ध होतेय.

यामध्ये तरूणाईचं योगदान उल्लेखनीय आहे.

रंगभूमीवर येणाऱ्या तरूणांची दृष्टी ही व्यापक आहे. जगात जे चालू आहे, ते त्यांच्या नाटकात पाहायला मिळतं, त्याचं ते लगेच अनुकरण करतात.

त्यांचं इम्प्लिमेंटेशन नाटकात पाहायला मिळतं.

जास्तीत नव्या कल्पना यायला हव्या. त्यामुळे मराठी रंगभूमी नक्कीच आणखी समृद्ध होईल.

 

“चेहरा नसलेल्या कलाकाराला चेहरा मिळवून देतो ते नाटक”- सिद्धार्थ जाधव

 

रंगभूमीशी काम करता करता आज मला अभिनय क्षेत्रात जवळपास 20 वर्षांचा काळ लोटला.

नाटकाने मला चेहरा दिला आहे.

सामान्य दिसणारा मी एकेकाळी एकांकिकांमधून अभिनय क्षेत्रात पाय रुजवू पाहत होतो.

कधी कधी वाट्याला रिजेक्शन्सही आली. पण त्याकडे दुर्लक्ष करत मी टॅलेंटच्या जोरावर स्वत: अभिनयाच्या क्षेत्रात आलो.

नाटकाने मला अभिनयाची संधी दिली. नाटकातून कामाचं कौतुक होतं.

नाटकात अभिनय हा लूक्स पेक्षा जास्त परिणामकारक असतो. त्यामुळेेच मला इथे संधी मिळाली आणि आज त्या जोरावर मी हिंदी सिनेसृष्टीपर्यंत पोहोचलो. रंगभूमीचा पाया नसता, तर आज मी इथवर पोहोचू शकलो नसतो. माझ्यातील कलाकार, अभिनेता ही रंगभूमीची देणगी आहे. रंगभूमीकडून मिळणाऱ्या ऊर्जेमुळेच मी आता ‘Energy चं powerhouse’ म्हणून ओळखला जातोय. या जागतिक रंगभूमी दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *