Fri. Jan 28th, 2022

अमानुष! तीन वर्षीय मुलीच्या अंगावर दिले मेणबत्तीचे चटके

पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञात व्यक्तीने अवघ्या तीन वर्षीय मुलीच्या अंगावर अमानुष चटके दिल्याची घटना समोर आली. यात तीन वर्षीय दिव्या गंभीर जखमी झाली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञात व्यक्तीने अवघ्या तीन वर्षीय मुलीच्या अंगावर अमानुष चटके दिल्याची घटना समोर आली. यात तीन वर्षीय दिव्या गंभीर जखमी झाली आहे. यामुळे दिव्या अत्यंत घाबरली असुन तिला रुग्णालयात नेण्यात आलं आहे. परंतु असा अमानुष प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकं प्रकरण काय?

पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञात व्यक्तीने अवघ्या तीन वर्षीय मुलीच्या अंगावर अमानुष चटके दिल्याची घटना समोर आली.

यात तीन वर्षीय दिव्या गंभीर जखमी झाली आहे. आणि अतिशय घाबरलेली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीची आई कल्पना दामोदर जोशी, यांनी अज्ञात व्यक्तिविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीडित मुलगी दिव्या ही घरात एकटीच होती. तेव्हा, अज्ञात व्यक्तीने घरात शिरून तिला मेणबत्तीच्या साहाय्याने हातावर, मांडीवर आणि पाठीवर चटके दिलेत.

यात ती गंभीर जखमी झाली असून आई आल्यानंतर घटनेचा उलगडा झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *