Mon. Jan 17th, 2022

‘तुला पाहते रे…’ फेम गायत्री दातार ‘या’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला!

‘तुला पाहते रे…’  या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली ईशा निमकर म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार आता मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कोल्हापूर डायरीज’ या मराठी सिनेमामधून ती सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. हा सिनेमा मल्याळम सिनेमृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या ‘अंगमाली डायरीज’ सिनेमाचा मराठी रिमेक असणार आहे.

काय असणार आहे गायत्रीची भूमिका?

‘अंगमाली डायरीज’ हा मल्याळम भाषेत trendsetting सिनेमा होता.

अंगमाली गावातील दोन राडेबाज टोळ्यांमधील हाणामारी असा या crime drama चा विषय होता.

हा सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावरही नावाजला गेला.

कुणीही मोठा कलाकार नसतानाही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता

याच सिनेमाचा मराठीमध्ये ‘कोल्हापूर डायरीज’ या नावाने रिमेक होत आहे.

या सिनेमात गायत्री वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

ही भूमिका ईशा निमकर या भूमिकेच्या अगदी विरुद्ध आहे, असं गायत्रीने म्हटलं आहे.

या सिनेमात ती कोल्हापूरी मुलीचं पात्र रंगवणार आहे

अवधूत गुप्ते या सिनेमाची निर्मिती करत असून राजन यांनी दिग्दर्शन केले आहे.

गायत्रीसोबत भूषण पाटील हा कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

तर महेश शेट्टी हा खलनायकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *