Jaimaharashtra news

ते सहा मंत्री अधिवेशनाला गैरहजर

नुकतचं राज्य सरकरच्या नव्या मंत्र्यांच खातेवाटप करण्यात आलं आहे. यामध्ये 6 मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. विधिंमंडळाचं शेवटचं अधिवेशन आजपासून सुरूवात झाली आहे. यावेळी आयाराम गयाराम श्री राम या घोषणा देवून विखेंना टोला देण्यात आला आहे. तर राजीनामे दिलेले हे मंत्री या अधिवेशनाला गैरहजर होते याचीही चर्चा होत आहे. मुख्यमंत्र्यांनी यांना वगळल्याने ते नाराज असल्याचे बोललं जातयं.

आजपासून अधिवेशन

16 जून रोजी राज्य सरकारच्या नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली.

विधिंमंडळाचं शेवटचं अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे.

या अधिवेशनास राजीनामे दिलेले मंत्री आज पहिल्याच दिवशी हजर नव्हते.

राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अंबरिष अत्राम यांनी राजीनामा दिला आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहीर केलं.

विनोद तावडे यांचे शिक्षण विभाग खाते आशिष शेलारांना देण्यात आलं आलं.

राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रकाश मेहता यांच्याकडील गृहनिर्माण खातं देण्यात आलंय.

परंतु राजीनामे घेतलेले हे सहा मंत्री अधिवेशनाला गैरहजर असल्याने ते नाराज असल्याचं म्हटलं जात आहे.

Exit mobile version