Sun. Sep 19th, 2021

‘त्या’ कोळी महिलांना ऐरोलीला स्थलांतरित करणार नाही – महापौर विश्वनाथ महाडेश्वर

छत्रपती शिवाजी महाराज मंडईत मासे विक्री करणारे कोळी महिला या मूळ भूमिपुत्र असून त्यांना ऐरोली येथे स्थलांतरित केलं जाणार नाही, असं प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना केलं.

क्रॉफर्ड मार्केट समोरील शिवाजी महाराज मंडईची इमारत धोकादायक ठरल्याने येथील मासळी बाजार ऐरोली येथे हलवली जाणार असल्याची नोटीस कोळी भगिनींना प्राप्त झाली होती.

याची माहिती मिळताच शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी कोळी भगिनींवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये याबतचे निर्देश महापौरांना दिले होते.

त्यानुसारच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिका आयुक्त श्री. प्रवीण परदेशी यांच्यासोबत 19 जुलै रोजी बैठक घेतली.

बैठकीनंतर प्रसारमाध्यम महापौर प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते.

महापौरांनी आयुक्तांना यासंदर्भात पत्र लिहिलं, त्यात पुढील मुद्दे होते-

टॅक समितीचा अहवाल प्राप्त होइपर्यंत मासेविक्री करणाऱ्या कोळी महिलांना स्थलांतरित करण्याचा निर्णय स्थगित करण्यात यावा

मुंबईतील कोळी महिला या येथील भूमिपूत्र असून त्यांचे अचानकपणे स्थलांतर केल्यामुळे विभागातील नागरिकांशी त्यांचे जोडलेलं नातंदेखील संपुष्टात येईल.

या कोळी महिलांना ऐरोली याठिकाणी स्थलांतरित न करता A विभागातच स्थलांतरित करण्यात यावं

A विभागात देण्यात येणारं स्थलांतर हे तात्पुरत्या स्वरुपाचंच राहणार असून या ठिकाणच्या इमारतींचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांना मूळ ठिकाणीच म्ह्णजेच पूर्वीच्याच ठिकाणी जागा देणार असल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितलं.

पत्रकार परिषदेला उप महापौर श्रीम. हेमांगी वरळीकर, सुधार समिती अध्यक्ष श्री.सदानंद परब, माजी महापौर तथा नगरसेवक श्री. मिलींद वैद्य, नगरसेवक श्री. आशिष चेंबुरकर, कोळी मच्छिमार संघटनेचे नेते श्री. दामोदर तांडेल हे मान्यवर उपस्थि‍त होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *