Sun. Mar 7th, 2021

त्रुटी शोधल्याबद्दल Instragram कडून चेन्नईच्या तरुणाला लाखो रुपयांचं इनाम

Instagram वर प्रसिद्धी पावून उत्पन्न कमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आधिकाधिक भन्नाट फोटो अपलोड करत आपले फॉलोअर्स वाढवणं, विविध sponsorship मिळवून जाहिराती करणं इत्यादी अनेक प्रकारे लोक सोशल मीडियावरून पैसे कमावतात. मात्र अशा Influencers पेक्षा चेन्नईतील एका तरुणाने आपल्या फोटोंच्या जोरावर नव्हे, तर बुद्धिमत्तेच्या बळावर इन्स्टाग्रामकडून 20 लाख 60 हजारांचं बक्षिस मिळवलं. या तरुणाचं नाव आहे लक्ष्मण मुथैया.

लक्ष्मण याने Instagram मधील बग शोधल्यामुळे त्याला इन्स्टाग्रामकडून 30 हजार डॉलर्स म्हणजेच 20 लाख 60 हजारांचं बक्षिस मिळालंय.

Instagram ची एक चूक त्याने लक्षात आणून दिली होती.

यावर आधी Facebook आणि Instagram सेक्युरिटी सिस्टमने विश्वास ठेवला नव्हता.

मात्र त्यानंतर आणखी माहिती जमा करून लक्ष्मण याने पटवून दिलं की रिकव्हरी कोडद्वारे Instagram हॅक करता येऊ शकतं.

कोणत्याही Instagram अकाउंटवरून पासवर्ड रिसेट, पासवर्ड रिकव्हरी कोडसाठी रिक्वेस्ट पाठवली जाते.

त्यामुळे याच्या Recovery Code द्वारे कोणाचंही Instagram Account हॅक करता येऊ शकतं, हे लक्ष्मणने सप्रमाण सिद्ध केलं.

लक्ष्मणच्या हुशारीने फेसबुक आणि इन्स्टाग्राम सेक्युरिटी टीम प्रभावित झाली.

या त्रुटीवर त्यांनी काम सुरू केलंय.

मात्र ही त्रुटी निदर्शनास आणून दिल्याबद्दल त्याला घसघशीत रक्कमेचं इनाम पाठवलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *