Tue. Sep 28th, 2021

थोरातांच्या गावात विखेंचं चहापान!

गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुंबईतुन लोणीकड़े परतताना अचानक संगमनेर शहरातील बस स्थानकाजवलील येवले चहा येथे थांबून चहाचा आस्वाद घेतला. यावेळी विखे पाटील यांच्याबरोबर अनेकांनी  सेल्फी काढल्या. अनेकांना तर स्वतः विखे यांनी चहाचे कप सर्व्ह केले.

विखे आणि थोरात यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे.

विखे पाटील यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर आज पहिल्यादा विखे पाटील यांनी – थोरातांच्या गावात येऊन चाहा पाणी घेतल्याने राजकीय चर्चेले मोठे उधाण आलंय.

काही दिवसांपूर्वी विखे विरोधक समजले जाणारे बाळासाहेब थोरात आणि विखे पुत्र सुजय विखे यांनी शिर्डी विमानतळावरुन एकाच विमानात शेजारी शेजारी बसून दिल्लीवारी केल्याचे फ़ोटो व्हायरल झाले होते.

आता विखेंनी संगमनेरात चहापाणी घेतल्याने विखे-थोरात वाद हे फक्त जनते समोर का, अशी चर्चा सुरू आहे.

मोठे विखे थोरातांवर टीका करतात तर लहान विखे विमानात बसून थोरातांबरोबर दिल्लीवारी करतात ? अश्या अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यायत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *