Fri. Jun 21st, 2019

दत्तक मुलीने boyfriend च्या मदतीने केली आई-वडिलांची निर्घृण हत्या

52Shares

नागपूरच्या दत्तवाडी येथील जेष्ठ नागरिक दाम्त्याच्या गुंतागुंतीच्या हत्येचा नागपूर शहर पोलिसांनी छडा लावला आहे. कोणत्याही प्रकारचे धागेदोरे नसतानाही पोलिसांनी 24 तासांत तपास केला आहे. या गुन्ह्यात मृतक दाम्पत्याची दत्तक मुलगी आणि तिच्या क्रिकेटपटू बाँयफ्रेंडला संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे.

काय होतं प्रकरण?

सुरक्षा नगर येथील रहिवासी 72 वर्षीय शंकर अतुलचंद्र चम्पती आणि त्यांच्या 64 वर्षीय पत्नी सीमा शंकर चम्पती यांची 14 एप्रिल रोजी हत्त्या झाली होती.

भरदिवसा नारळ कापण्याचा कोयता आणि लाठीने हल्ला करून या वृद्ध दाम्पत्याला निर्घृणपणे ठार  करण्यात आलं होतं.

रात्री 8.05 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

त्यांच्या हत्येपूर्वी त्यांना झोपेच्या अथवा गुंगीच्या गोळ्या देण्यात आल्या असाव्या असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

हत्येनंतर घरातील रोख रक्कम लुटण्यात आल्याचा देखावा निर्माण करण्यात आला होता.

दोघांची दत्तक मुलगी प्रियंका दुपारी 12 .45 सुमारास बाहेर गेली होती.

ती रात्री 8.05च्या सुमारास घरी आली असता दोघांचा खून झाल्याचं तिला दिसलं, असं तिने म्हटलं होतं.

मात्र पोलिसांना संशय आला.

प्रकरण खूपच गुंतागुंतीचं होतं.

मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्रकरणाची उकल केली.

 

प्रत्यक्षात काय घडलं होतं?

या दाम्पत्याने सहा महिन्याची असताना प्रियंका नावाच्या मुलीला दत्तक घेतलं तिला लहानाची मोठी केली, उच्च शिक्षण दिलं.

ती मोठी व्हावी असं स्वप्न उराशी बाळगत तिला काम्पुटर इंजिनिअर बनवलं.

आई वडिलांसोबत राहताना प्रियंका मोहमद अखलाख या क्रिकेटपटूच्या प्रेमात पडली.

याला आई वडिलांचा विरोध होता.

त्यामुळे प्रियंकाचं काही दिवसांपासून आई वडिलांसोबत पटत नव्हतं.

आई वडिलांचा बदला घेण्यासाठी तिने मोठा प्लान आखला.

त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आपलं फेसबुक अकाउंट, जी मेल अकाउंट मोबाईल कॉल डिटेल सगळं काही DELETE केलं.

घटनेच्या दिवशी प्रियकराच्या मदतीने गुंगीचं औषध मागविलं.

टरबुजात ते औषध टाकलं आणि आई वडिलांने ते दिलं.

दोघेही झोपून गेल्यावर ती ब्युटी पार्लर मध्ये गेली.

प्रियकराने घरात येऊन ठरल्याप्रमाणे दोघांचीही हत्या केली.

ही हत्या इतक्या क्रूरतेने केली की पोलीस सुद्धा हैराण झाले.

घरात आई वडिलांची निर्घृण हत्या होत होती आणि हे माहीत असूनही मुलगी ब्युटी पार्लरमध्ये आणि शॉपिंगमध्ये एंजॉय करत होती.

हत्येनंतर पैसे आणि दागिने सुद्धा त्यांनी सोबत घेतले होते.

रात्री मुलगी घरी आली आणि घरात चोरी आणि हत्या झाल्याचा बनाव तिने केला.

मात्र पोलिसांचं चक्र तोपर्यंत वेगळ्या दिशेने फिरायला लागलं.

त्यांनी तंत्रज्ञानाची मदत घेतली आणि अवघ्या आठ तासात ही हत्या मुलीनेच कट रचून प्रियकराच्या मदतीने केल्याचं तपासात पुढे आणलं.

मुलीला आणि तिच्या Boyfriend ला पोलिसांनी अटक केली आहे.

Boyfriend क्रिकेटपटू बनला क्रिमिनल!

प्रियंकाचा boyfriend महंमद अखलाक हा क्रिकेटर आहे.

त्याने अनेक फॉरमॅट मध्ये क्रिकेट खेळालं आहे.

दोघांमध्ये गेल्या 5 ते 6 वर्षांपासून love affair सुरू होतं.

प्रियंका Computer Engineer आहे.

एवढी सुशिक्षित असूनही अशा प्रकारे एवढा मोठा गुन्हा दोघांनी केला, यावरून त्यांची मानसिकता नेमकी कोणत्या स्तराला पोहचली असावी हे दिसून येते.

52Shares

Leave a Reply

%d bloggers like this: