Fri. Jun 18th, 2021

दाऊदचा पुतण्या रिझवान कासकरला खंडणीप्रकरणी अटक!

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमला मुंबई पोलिसांनी आणखी एक दणका दिलाय. मुंबईच्या खंडणी विरोधीपथकानं बुधवारी रिझवान इकबाल इब्राहिमला म्हणजेच दाऊदच्या पुतण्याला अटक केलीये. मुंबईतल्या एका व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकवण्यात त्याचा हात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी रिझवानला भारतातून पळ काढण्याआधीच विमानतळावर अटक केली.

बांधकाम आणि चीन आणि दुबईहून इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची आयात करणाऱ्या व्यावसायिकानं ही तक्रार केली होती.

त्यानं 3 वर्षांपूर्वी अश्‍फाक रफिक टॉवलवाला याच्यासोबत भागीदारीत व्यवसाय सुरू केला होता.

त्याला अश्‍फाककडू 15 लाख 50 हजार रुपये येणं होतं.

त्यासाठी त्यानं अनेकदा मागणी केली होती.

त्यावेळी अहमद राजा अफ्रोज वधारियानं 12 जूनला धमकीचा फोन केला होता.

त्यावेळी त्यानं आपण कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याचा हस्तक ‘फहिम मचमच’ याचा हस्तक असल्याचं सांगून धमकावलं.

तसंच, इक्बाल कासकरचा पुतण्या रिजवान यानंही त्या व्यावसायिकाला धमकावलं होतं.

त्यानं निकटवर्तीय असलेल्या टॉवरवाल्याकडून पैशाची मागणी करू नकोस, अशी धमकी तक्रारदाराला दिली होती.

त्यानंतर, 13 आणि 16 जूनला व्यावसायिकाला आलेले हे धमकीचे फोन त्यानं रेकॉर्ड करून या तिघांविरोधात मुंबई पोलिसांकडं तक्रार दाखल केली. त्यावेळी गुन्हा दाखल करत दुबईवरून परतल्यानंतर अहमदला अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *