Thu. Jul 18th, 2019

दुष्काळात तेरावा महिना, चक्क ‘अशा’ प्रकारची चोरी!

0Shares

आजपर्यंत आपण अनेक प्रकारच्या चोऱ्या पाहिल्या, मात्र अहमदनगर जिल्ह्यात चक्क शेतकऱ्यांच्या बागेतील संत्री चोरीला गेली आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात राहणाऱ्या पाच शेतकऱ्यांच्या बागेतील तब्बल दीडशे कॅरेट संत्र चोरीला गेल्याने अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावात अश्विन क्षीरसागर, रूपचंद अकोलकर, भाऊसाहेब आकोलकर, राजू शिरसागर आणि चंद्रकांत अकोलकर या पाच शेतकऱ्यांच्या संत्र्याच्या बागा होत्या.

सर्व शेतकऱ्यांचे मिळून तब्बल 800 संत्र्यांची कॅरेट होती. पाच वर्षं या शेतकऱ्यांनी कष्ट करून, दुष्काळाचा सामना करून या बागा जगवल्या होत्या.

पाच वर्षांनंतर या बागांमधील झाडांना फळंही आली. मात्र ऐन दुष्काळाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास गेला. या शेतकऱ्यांच्या बागांमध्ये सर्व संत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

जवळपास दीडशे कॅरेट संत्रे चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालंय.

त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

एकीकडे संपूर्ण राज्यात दुष्काळ आहे, शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहे.

त्यातच ऐन दुष्काळात करंजी येथील  शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निघून गेल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *