Wed. Jun 16th, 2021

दुष्काळामुळे पाण्याखालील ‘हे’ प्राचीन मंदिर आलंय पृष्ठभूमीवर!

गेली चाळीस वर्ष उजनीच्या पाण्याखाली गडप झालेलं पळसनाथ मंदिर दृगोच्चर झालंय. 1972 पेक्षाही तीव्र दुष्काळ यावर्षी पडल्याच्या खुणा आता दिसू लागल्या आहेत. दुष्काळामुळे उजनी आटलीय आणि गेली चाळीस वर्षं पाण्याखाली असलेलं पळसनाथ आता जमिनीवर आलंय.

पाण्याखालील पळसनाथ!

हेमाडपंथी स्थापत्यशैली असलेल्या पळसनाथ मंदिराचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्येही आहे.

ज्ञानेश्वरीच्या आठराव्या आध्यायात पलाशतीर्थ म्हणून या मंदिराचा उल्लेख करण्यात आलाय.

मंदिराचा भव्य कळस, समोरील सभा मंडप आणि कोरीव दगड या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुराण काळात घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत.

तब्बल चार दशक पाण्याखाली राहिल्याने मंदिराची बरीच पडझड झाली आहे.

तरीही मंदीराची मूळ वास्तू पाहण्याचा मोह कुणालाही आवरणार नाही.

1975 साली उजनी धरणाच्या बांधकामानंतर हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेलं. मात्र या वर्षी उजनीची पाणी पातळी बरिच खालावल्याने मंदिर इंदापुरकरांच्या नजरेस पडलंय.

या मंदिराची वैशिष्ट्यं!

शके 1079 (सन 1157) मध्ये हे मंदिर उभारण्यात आलं.

या मंदिरात पूर्वी शिवलिंग होतं. मात्र ते आता दुसरीकडे मंदिर बांधून स्थापन करण्यात आलंय.

बोटीने अत्यल्प दरात या मंदिराकडे जाता येतं.

मंदिरात अनेक शिल्पं दृष्टीस पडतात.

येथील दगडांवर दुसरा दगड विशिष्ट पद्धतीने घासल्यास सप्तसुरांचा नाद ऐकू येतो.

हे मंदिर पर्यटकांचं आवडतं पर्यटनस्थळ बनलं आहे. मात्र सातत्याने पाण्याखाली असल्याने या मंदिरामध्ये शंख शिंपल्यांचा खच असतो. काही प्रमाणात चिखलही असतो. तरीही सहसा पाहायला न मिळणाऱ्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी पर्यटक दुष्काळातही या मंदिराला भेट देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *