Mon. Jul 26th, 2021

दोन दिवसात मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमधील पातळीत वाढ

दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे यामध्ये  मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमधील पातळीत वाढ झाली आहे. कालच्या मुसळधार पावसानं तलावक्षेत्रातील जलसाठा 5.31 हजार दश लक्ष इतका झाला.

गेल्या आठवड्यात मुंबईकरांना 20 दिवस पुरेल इतकचं पाणी शिल्लक होत. पण दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे यामध्ये  मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमधील पातळीत वाढ झाली आहे.  कालच्या मुसळधार पावसानं तलावक्षेत्रातील जलसाठा 5.31 हजार दश लक्ष इतका झाला. काल पासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या पावसामुळे धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे.

आतापर्यंत धरण क्षेत्रात झालेल्या पावसाची आकडेवारी

अप्पर वैतरणा 221 मिमी

मोडक सागर 364 मिमी

तानसा 266 मिमी

मध्य वैतरणा 278 मिमी

भातसा 358 मिमी

विहार लेक 640 मिमी

तर तुळशी लेक 750 मिमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *