Jaimaharashtra news

दोन TV अभिनेत्रींचा कार अपघातात मृत्यू

TV Serial मध्ये काम करणाऱ्या दोन तरुण अभिनेत्रींच्या कारचा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात दोघीही अभिनेत्री जागीच ठार झाल्या. भार्गवी आणि अनुषा अशी या अभिनेत्रींची नावं आहेत.

काय घडलं नेमकं?

तेलुगू टीव्ही मालिका ‘मुत्यला मुग्गू’ या मालिकेचं शूट विक्रमगड येथील अनंतगिरी जंगलात सुरू होते.

मंगळवारी रात्री शुटिंगनंतर दोघी हैदराबाद येथे आपल्या घरी चालल्या होत्या.

त्यांच्यासोबत ड्रायव्हर चक्री देखील होता.

गुडा परिसरात कारने जात असताना ड्रायव्हरचं कारवरील नियंत्रण सुटलं.

विकाराबाद येथे कारने समोरून येणाऱ्या गाडीशी धडक टाळण्याचा प्रयत्न केला.

याच प्रयत्नात कार झाडावर आदळली.

या दुर्घटनेत ड्रायव्हर जखमी झाला.

मात्र भार्गवी आणि अनुषा दोघींचा जागीच मृत्यू झाला.

भार्गवी ही अवघ्या 20 वर्षांची होती तर अनुषा 21 वर्षांची.

कारमध्ये असणारे आणखी दोघेजणही या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

भार्गवी तेलुगू TV industry मध्ये नामांकित अभिनेत्री होती, तर अनुषाची ही पहिलीच मालिका होती.

मराठी कलाकारांनी गमावले आहेत अशा अपघातात प्राण

शुटिंगची व्यस्त schedules आणि त्यामुळे कधीही करावा लागणारा रात्री अपरात्रीचा प्रवास यांमुळे अनेकदा कलाकारांचे दुर्दैवी अपघात घडले आहेत. मराठी नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री भक्ती बर्वे-इनामदार यांचाही रात्री झालेल्या कार अपघातात मृत्यू झाला होता.

मराठी नाट्य, सिनेमा आणि मालिका विश्वातील नामवंत आणि प्रतिभाशाली कलाकार आनंद अभ्यंकर यांचाही रात्री कार अपघात घडून मृत्यू झाला होता. त्यांच्यासोबत कारमध्ये असणाऱ्या अक्षय पेंडसे या तरुण अभिनेत्याचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता.

 

 

Exit mobile version