धक्कादायक! ‘Selfie’ परफेक्ट नाही, 74 % स्त्रियांचा आत्मविश्वास खालावला!

आता ‘सेल्फीसाठी काहीही’ म्हणायची वेळ आली आहे. परफेक्ट सेल्फी मिळत नाही म्हणून 74 टक्के स्त्रियांचा आत्मविश्वास खालावल्याची बाब उघड झाली आहे.
मुंबईतील ‘एस्थेटिक क्लिनिक्स कॉस्मेटिक सर्जरी’ आणि ‘स्किनकेअर’ने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.
काय दिसलं सर्वेक्षणात?
मुंबईत पुरुषांमध्ये चिंतेचं प्रमाण 63 टक्के, तर स्त्रियांमध्ये 75 टक्के दिसून आलंय.
कलकत्ता, दिल्ली, मुंबई आणि हैदराबादमध्ये कॉस्मेटिक सर्जरींसाठी येणाऱ्या 300 रुग्णांचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढले आहेत.
जे लोक कोणताही फिल्टर न वापरता त्यांच्या अनटच्ड सेल्फीज पोस्ट करतात, त्यांचा मानसिक ताण वाढल्याचं आणि आत्मविश्वास कमी झाल्याचं या अहवालात म्हटलंय.
यात स्त्रियांचं प्रमाण आणि तरुणाईचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलंय.
मात्र याचे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याचे डॉक्टरांचा म्हणणं आहे.