नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्यावर गोळीबार

देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्यावर अज्ञात इसमाने केला गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून खंडेलवाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतर सर्व व्यापारी वर्गाने बाजार पेठ बंद ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नगरसेवकावर गोळीबार
खंडेलवाल हे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक आहे.
शुक्रवारी पिंपरी चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली येथील कार्यालयाची तोडफोड झाली होती.
भरदिवसा नंग्या तलवारी आणि कोयते नाचवत ही तोडफोड केली गेली होती.
यानंतर यांच्यावर अज्ञात इसमाने केला गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली.
नगरसेवकांवरच असे हल्ले होऊ लागल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले जाते.
देहूरोड नगरसेवक विशाल खंडेलवाल गोळीबार प्रकरणी सर्व व्यापारी वर्गाने बाजारपेठ बंद ठेवली आहे.