Sat. Oct 1st, 2022

“नवरा आणि सासरच्या मंडळींनी केले माझे नग्न फोटो व्हायरल!” विवाहितेचा आरोप!

आपला नवरा, सासू, सासरे आणि दीर या सर्वांनी मिळून माझं सोशल मीडिया अकाऊंट्स हॅक करून  माझे नग्न फोटो अपलोड केले, असा धक्कादायक आरोप एक विवाहितेने केला आहे. तसंच आपण देहविक्रय करत असल्याची अफवाही आपल्याच सासरच्या नातेवाइकांनी पसरवल्याचाही आरोप तिने केलाय. फिर्यादी विवाहिता ही 26 वर्षीय असून बंगळुरूची निवासी आहे. या संदर्भात तिने पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली आहे.

नवरा नपुंसक असल्याने सारा बनाव?

पीडित विवाहितेचा विवाह ऑक्टोबर 2017 मध्ये झाला.

या विवाहासाठी या मुलीच्या वडिलांनी 30 लाखाहून जास्त पैसा खर्च केला.

मात्र लग्नाच्या पहिल्या रात्रीच एका धक्कादायक गोष्टीचा खुलासा झाला.

या महिलेचा पती नपुंसक निघाला.

सासरच्या मंडळींनी ही गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली होती, असा आरोप महिलेने आता केलाय.

नवऱ्यामुळे आपल्याला कायम मानसिक त्रास दिल्याचा आरोपही विवाहितेने केलाय.

इतकंच नव्हे, तर पतीने आपल्यावर परपुरुषाशी शरीरसंबंध ठेवण्याचाही आग्रह धरला होता.

पतीच्या नपुंसकतेवर शस्त्रक्रिया करता यावी, यासाठी सासरची मंडळी आपल्याकडून पैसे मागत होते.

लग्नावर 30 लाख रुपये खर्च केल्यावरही या शस्त्रक्रियेसाठी 25 लाख रुपयांची मागणी सातत्याने केली जात होती.

आपण यासाठी नकार दिल्यामुळे सासरचे नातेवाईक आपल्याविरोधात गेल्याचं फिर्यादीने म्हटलं आहे.

आपल्याला अन्नामधून झोपेच्या गोळया देण्यात आल्या.

झोपेत असताना आपल्याला नग्न करून आपले फोटो काढण्यात आले तसंच न्यूड व्हिडिओही तयार केले.

त्यानंतर आपलं फेसबुक अकाऊंट हॅक करुन त्यावर सासरच्या मंडळींनी सर्व नग्न फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले, असा भीषण आरोप पीडित महिलेने केले आहेत.

मात्र अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेलं नाही. सर्व तपास केल्यानंतरच आपण कारवाई करणार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.