नव्या मंत्र्यांच खातेवाटप जाहीर

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार आज रविवारी अखेर पार पडला. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित 13 आमदारांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेनेला दोन कॅबिनेट मंत्रीपदे देण्यात आली आहेत. या नव्या राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जारी करण्यात आलं आहे.
राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जारी
कॅबिनेट मंत्री
आशिष शेलार – शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण
जयदत्त क्षीरसागर – रोजगार हमी आणि फलोत्पादन
संजय कुटे – कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती
सुरेश खाडे – समाज कल्याण
राधाकृष्ण विखे पाटील – गृहनिर्माण मंत्री
अनिल बोंडे राज्याचे नवे कृषीमंत्री
अशोक उईके – आदिवासी विकास
तानाजी सावंत – जलसंधारण
राम शिंदे – पणन आणि वस्त्रोद्योग
संभाजी पाटील-निलंगेकर- अन्न नागरिक पुरवठा, ग्राहक संरक्षण
जयकुमार रावल – अन्न आणि औषध प्रशासन
सुभाष देशमुख – सहकार, मदत आणि पुनर्वसन
राज्यमंत्री
योगेश सागर – नगर विकास
डॉ. परिणय फुके – सार्वजनिक बांधकाम
संजय भेगडे – कामगार, पर्यावरण
अविनाश महातेकर- सामाजिक न्याय राज्यमंत्री
अतुल सावे- उद्योग व खणिकर्म, अल्पसंख्याक विकास व वक्फ