Thu. Aug 13th, 2020

नांदेडमध्ये बाळासह उभ्या असलेल्या महिलेला मोकाट जनावरानं उचलून फेकलं

नांदेडमध्ये मोकाट गुरांचा सुळसुळाट झाला आहे. ही मोकाट जनावरं लोकांच्या जीवावर उठली आहेत. नांदेडच्या वजीराबाद भागात बाळासह उभ्या असलेल्या एका महिलेला मोकाट जनावराने उचलून फेकलं आहे.

नांदेडमध्ये मोकाट गुरांचा सुळसुळाट झाला आहे. ही मोकाट जनावरं लोकांच्या जीवावर उठली आहेत. नांदेडच्या वजीराबाद भागात बाळासह उभ्या असलेल्या एका महिलेला मोकाट जनावराने उचलून फेकलं आहे. हा सगळा प्रकार CCTV मध्ये रेकॉर्ड झाला आहे. या महिलेला वळू आपल्याकडे येत असल्याची कोणतीच कल्पना नव्हती. ती बेसावध असताना बैलाने तिला उडवलं, त्यामुळे या महिलेला जबर दुखापत झाली आहे. नांदेडमध्ये भर रस्त्यात मोकाट गुरं थैमान घालतात, मात्र मनपा त्यावर काहीच उपाययोजना करत नाही. त्यातून नागरिकांना जीव मुठीत धरून राहावं लागतं. राज्याचे मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याच्या वेळी महापालिकेनं मोकाट गुरांचा महापालिकेने बंदोबस्त केला. पण सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा मात्र महापालिका प्रशासन डोळेझाक करत असल्याचं दिसून येतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *