Tue. Sep 24th, 2019

नागपूरमध्ये मिशी प्रकरण चिघळलं, नाभिक समाजाचा आंदोलनाचा इशारा 

नागपूरमध्ये  न्हाव्यानं न विचारता मिशा कापल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी किरण ठाकूरच्या हजामतीवर नाभिक समाजाने बहिष्कार टाकला आहे.

0Shares

नागपूरमध्ये  न्हाव्यानं न विचारता मिशा कापल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी किरण ठाकूरच्या हजामतीवर नाभिक समाजाने बहिष्कार टाकला आहे. कोणीही किरण यांची दाढी आणि केस कापू नये, असं आवाहन संघटनेनं केलं आहे. ठाकूर यांनी जाणिवपूर्वक प्रसिद्धीसाठी हा वाद निर्माण केल्याचा आरोप करत या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे.

नाभिक समाजाचा आंदोलनाचा इशारा

नागपूरात न्हाव्यानं न विचारता मिशा कापल्यानं गुन्हा दाखल करणाऱ्या किरण ठाकूरच्या हजामतीवर नाभिक संघटनेनं बहिष्कार टाकला आहे. कोणीही किरण यांची दाढी आणि केस कापू नये, असं आवाहन संघटनेनं केलं आहे.

त्यामुळं या “मिशा’ प्रकरण आणखीणच चिघळंलय. मिशीवर वस्तरा फिरविल्यानंतर वाद घातल्यानं आणि पाहून घेण्याची धमकी मिळाल्यानं किरण यादव यांच्या तक्रारीवरून सलून मालकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर राज्यभर या विषयाची चर्चा झाली.

यामुळं नाभिक संघटना भडकल्या आहेत. किरण ठाकूर हे केवळ प्रसिद्धीसाठी मिशीवर “महाभारत’ करीत असल्याचा आरोप नाभिक संघटनेनं केला आहे.  यापुर्वी अनेकदा ठाकूर यांनी दाढी-मिशा कापल्या आहेत.

अनेक पोस्टरवर त्यांचे दाठी-मिशा नसलेले फोटो आहेत. त्यामुळं मिशा कापल्यावर त्याचा मोठा वाद करत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ठाकूर यांनी जाणिवपूर्वक प्रसिद्धीसाठी हा वाद निर्माण केल्याचा आरोप करत या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिलाय.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *