Fri. Jan 21st, 2022

नालासोपाऱ्यातील तुळींज स्मशानभूमीत रात्रीस खेळ चाले

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 

नालासोपाऱ्यातील तुळींज रोड येथील स्माशानभूमीत वीज आणि पाणी नसल्यामुळे अंतिम संस्कार मोबाईलच्या प्रकाशात करावे लागत आहे.

 

यामुळे नागरिकात तीव्र संताप व्यक्त केला जातोय.  स्मशानात लाईटचा मीटर असून लाईट नाही, तोंड,हात धुवायला पाणी नाही.

 

जिवंतपणी पाणी दिल नाही. जाताना तरी पाणी द्या असं संतप्त नातेवाईकांचं म्हणण आहे.

 

शहरातील अनेक सोई सुविधांचा बोजवारा उडाला.  जिवंतपणी तर यातना भोगल्या आहेत. शेवटच्या अखेरच्या प्रवासामध्येही असा त्रास होत असेल मग करायचे काय ?अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *