Wed. Dec 1st, 2021

नाशिकमध्ये लवकरच टायर बेस्ड मेट्रो!

केंद्र आणि राज्य सरकारचा महत्वाकांक्षी मेट्रो प्रोजेक्ट लवकरच नाशिकमधे सुरु केला जाणार आहे. 1800 ते 2000 कोटी रुपयांच्या या मेगा प्रोजेक्टच्या माध्यमातून शहरातील दोन प्रमुख मार्गांवर टायर बेस मेट्रो धावणार असून येत्या चार वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. देशातल्या या पहिल्या टायर बेस मेट्रो प्रकल्पाच्या मंजुरीसाठी हा प्रोजेक्ट मंत्रीमडळाच्या बैठकीत सादर केला जाणार आहे

तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून संपूर्ण देशात ओळख असलेल्या नाशिकला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकांआधी दत्तक घेतलं. मुख्यमंत्र्यांनी नशिक दत्तक घेतल्यानंतर विरोधकांनी टीका तर केलीच पण नेमक नाशिकला मुख्यमंत्र्यांकडून काय मिळालं, याबाबत अनेकदा आरोप देखिल झाले. मात्र 2000 कोटी रुपयांचा मेगा टायर बेस मेट्रो प्रोजेक्ट देवुन मुख्यमंत्र्यांनी नाशिकला मोठंच गिफ्ट दिलं आहे..

नाशिकसाठी तयार करण्यात आलेल्या मेट्रोचं नाव मेट्रो नियो

ओव्हरहेड ट्रॅक्शनवर चालणार मेट्रो नियो..

शहराच्या महत्वाच्या टोकांना जोडण्यासाठी प्रोजेक्ट..

प्रत्येक मेट्रोसाठी 25 मीटर लांबीचे इलेक्ट्रिक कोच असणार

एकावेळी या कोचमधे 240 ते 250 प्रवासी प्रवास करु शकणार.

पहिल्या टप्प्यात दोन कॉरिडॉर असणार

गंगापूर रोड ते नाशिकरोड असा 22 किलोमीटरचा पहिला रुट असणार आहे. या रुटवर 19 स्टेशन असणार आहेत.

तर गंगापुर ते मुंबइनाका असा 10 किलोमीटरचा दुसरा रुट या रुटवर 10 स्टेशन्स असणार आहेत.

दोन फिडर कोच रुटदेखील असणार आहेत. CBS हे दोन्ही रुटसाठी मध्यवर्ती जोडणारं स्टेशन असेल.

आरामदायक सिट्स, ऑटोमेटीक दरवाजे असतील.

येणाऱ्या काही दिवसात मंत्रीमंडळाकडून या प्रकल्पाला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर लवकरच मेट्रोचा काम नाशिक मध्ये सुरू करून या महत्वाकांक्षी प्रोजेक्टचं काम चार वर्षात पुर्ण होणार असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली आहे

केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांमधे महामेट्रोचा समावेश असल्यानं मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रोजेक्टसाठी आपली संपूर्ण ताकद लावलेली आहे. दरम्यान नाशिकला मेट्रो सेवा सुरु होणार असल्यानं एकीकडे नाशिककरांच्या अपेक्षा वाढल्या असल्या, तरी स्मार्ट सिटीच्या रखडलेल्या कामाप्रमाणे महामेट्रोचं कामदेखील रखडणार नाही अशी अपेक्षा नाशिककर बाळगून आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *