Sat. Jul 31st, 2021

निवडणूक काळात लग्न! तर ‘या’ गोष्टीकडे द्या लक्ष…

आदर्श आचार संहिता सुरू असताना तुम्ही जर लग्नपत्रिकेच्या माध्यमातून कुठलही राजकीय आवाहन करत असाल किंवा प्रचाराशी संबंधित मजकूर त्यात असेल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे निवडणूक काळात लग्न करणार असाल तर या बाबींची काळजी घ्या.

काय आहे आचारसंहितेचे नियम?

देशात लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलंय.

आदर्श आचार साहित्य लागू झाली आहे. त्याचे अनेक नियम आहेत. .

आचारसंहितेच्या काळात तुमच्याकडे लग्नकार्य असेल, तर लग्नपत्रिका छापताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

तुमच्या लग्नपत्रिकेतून कुठल्याही राजकीय पक्षाला त्याचा फायदा पोहचेल, किंवा निवडणूक प्रचार होईल असा काही मजकूर नसावा.

जर असं आढळून आलं, पत्रिका छापणाऱ्या पासून तर नवरी नवरदेवाला सुद्धा कारवाईचा सामना करावा लागू शकतो.

त्यामुळे याबाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

आचारसंहितेचं उल्लंघन झालं तर 127 A नुसार खुलासा विचारला जाईल.

नोटीस बजावण्यात येऊ शकते.

त्यामुळे निवडणुकीचा उत्साह लग्नापासून किंवा कुठल्याही घरगुती कार्यक्रमापासून दूर ठेवा. अन्यथा शुभकार्यात विघ्न यायला वेळ लागणार नाही.

राजकीय पक्ष आणि उमेदवारांशी संबंधित कुठलाही मजकूर येणार नाही याची खबरदारी घ्या नाही तर अतिउत्साहीपणा अंगावर येऊ शकतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *