Fri. Sep 30th, 2022

“नोटबंदीनंतर आतंकवादी हल्ले वाढले ” – छगन भुजबळ

‘नोट बंदीमुळे अतिरेक्यांचे कंबरडे मोडेल असे सांगितले जात होते. मात्र तरीही गेल्या 5 वर्षात अनेक अतिरेकी हल्ले झाले. या हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले’, असं पत्रकारांशी बोलत असताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ काय म्हणाले ?

पुलवामा हल्ला हा सर्वात मोठा हल्ला आहे.

गुप्तचर यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे हा हल्ला झाला आहे.

हल्ला होणार असे माहित असताना काळजी का घेण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला

एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच तुकडीमध्ये जवानांना नेणे चुकीचे आहे.

या घटनेनंतरही आम्ही सरकार आणि सैन्याबरोबर आहोत असेही त्यांनी आपले मत मांडले आहे.

नोटबंदीनंतर आतंकवादी हल्ले वाढले आहे.

पाकिस्तानशी सर्व नाते तोडले पाहिजे असे छगन भुजबळ म्हणाले.

त्यानंतर भुजबळ यांनी पंतप्रधानांवर जोरदार टीका केली.

एकीकडे जवानांचे कुटुंबिय आणि देशवासीय निषेध करत होते. तर दुसरीकडे पंतप्रधान उदघाटन करण्यात व्यस्त होते, असे भुजबळ यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.