Thu. May 13th, 2021

पबजी खेळण्यास मनाई केल्याने मोठ्या भावावर कैचीने वार

पबजी गेमची क्रेझ युवकांमध्ये वाढतच चालली आहे. त्यातून घडणाऱ्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मोठ्या भावाने लहान भावाला पबजी गेम खेळण्यास मनाई केल्याने त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली आहे.

पबजी गेमची क्रेझ युवकांमध्ये वाढतच चालली आहे. त्यातून घडणाऱ्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मोठ्या भावाने लहान भावाला पबजी गेम खेळण्यास मनाई केल्याने त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली आहे. अशा घटना काहूी नवीन नाहीत. या गेमच वेड तरुणांमध्ये चांगलच पसरलं आहे. यामु्ळे युवक गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत.

नेमकं काय घडलं?

मोठ्य़ा भावाने पबजी खेळण्यास मनाई केल्याने राग अनावर न झाल्याने लहान भावाने कैचीने शरीरावर वार केले.

यामध्ये मोहम्मद हुसैन वय 19 हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ इंदिरा रुग्णालयात नेण्यात आले आहे.

कैची ने शरीरावर केलेले हे वार गंभीर असल्याने त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.

हत्येप्रकरणी लहान भाऊ मोहम्मद फहादला शांतीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *