Wed. Dec 8th, 2021

पराभवानंतर अशोक चव्हाण यांची ‘ही’ प्रतिक्रिया

“महाराष्ट्रात जो काँग्रेसचा प्राभाव झालाय त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारतोय. आगामी लोकसभेचा कोणताही परिणाम विधानसभा निवडणुकीवर होऊ देणार नाही” अशी पहिली प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय. महाराष्ट्रात झालेल्या काँग्रेसच्या पराभवासोबतच खुद्द चव्हाण यांना आपला नांदेड मतदारसंघही वाचवता आला नाही. याबद्दल बोलताना ‘पराभवाची कारण मीमांसा करावी लागेल तसेच आत्मपरीक्षण करावे लागेल’ असं उत्तर त्यांनी दिलं.

नांदेडच्या जनतेने दिलेला कौल आपल्याला मान्य आहे.

नांदेडने अत्तापर्यंत आपल्याला आणि कुटुंबाला अनेकवेळा निवडून दिलंय.

यावेळी त्यांनी दुसरा पर्याय निवडला असेल, तर तो आपण स्वीकारतो.

यापुढेही पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील, ते मान्य असल्याची प्रतिक्रिया त्यांनी पराभवानंतर दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *