Jaimaharashtra news

पश्चिम बंगालमध्ये भाजप व तृणमूलचे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, 5 जणांचा मृत्यू

भाजप व तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले असून यामध्ये चार भाजप कार्यकर्त्यांचा तर एका तृणमूलच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील 24 परगाणा जिल्ह्यातील संदेशखाली भागात ही घटना घडली आहे. आणखी काही कार्यकर्ते बेपत्ता असल्याचे देखील सांगण्यात येत आहे

नेमकं प्रकरण आहे?

पश्चिम बंगालमधील 24 परगाणा जिल्ह्यात भाजप व तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

यावेळी  हाणामारीत चार भाजप कार्यकर्त्यांचा तर एका तृणमूलच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.

आणखी काही कार्यकर्ते बेपत्ता असल्याचे देखील समजते.

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. यामुळे मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे.

निवडणूकीचा निकाल लागून तब्बल 16 दिवस लोटले असतानाही हा हिंसाचार झाला.

कोलकातापासून 70  किलोमीटर अंतरावर असलेल्या नयजात येथे भाजपने विजयी रॅली काढली होती.

या रॅलीच्या वेळी अचानक गोळीबार झाला. या गोळीबारानंतर तृणमूल व भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

या हाणामारीत चार भाजप कार्यकर्ते तर  एका तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्त्याचा मृत्यू झाला.

सुकंता मोंडल, प्रदीप मोंडल, तपन मोंडल, देबदास मोंडल अशी मृत्युमुखी पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांची नावे आहेत.

तर कुय्यम मोल्लाह असे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे नाव आहे.

Exit mobile version