पाकिस्तानचं एफ-16 पाडल्याचे IAF कडून पुरावे!

बालाकोट हल्ल्यादरम्यान भारतीय वायूसेनेने पाकिस्तानचं F-16 हे लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला होता. मात्र अमेरिकेकडून जेवढी एफ – 16 लढाऊ विमानं पाकिस्तानने विकत घेतली होती, ती सर्व तशीच्या तशी पाकिस्तानकडे सुरक्षित असल्याची माहिती अमेरिकेच्या ‘फॉरेन पॉलिसी’ या मॅगझिनने जाहीर केली. त्यामुळे खरोखर IAF कडून पाकिस्तानचं F-16 विमान पाडण्यात आलं होतं का, असा सवाल केला जाऊ लागला. मात्र आता भारतीय वायूसेनेने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.

अमेरिकेचा दावा खोटा!

अमेरिकन magazine ने केलेला दावा खोटा असल्याचं स्पष्टीकरण Indian Air Force ने दिलंय.

पाकिस्तानच्या एफ – 16 विमानाने भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता.

हे विमान भारतीय वायूसेनेच्या MIG- 21 या विमानाने he[nx.

याचे सबळ पुरावे भारतीय वायुसेनेकडे असल्याचं स्पष्टीकरण भारतीय वायूसेनेचे अधिकारी एअर व्हाइस मार्शल आरजीके कपूर यांनी सांगितले.

काय घडलं होतं?

पुलवामा हल्ल्यानंतर IAF ने पाकिस्तानच्या बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्धवस्त केले होते.

IAF च्या या एअर स्ट्राईकनंतर 26 फेब्रुवारीला पाकिस्तानची तीन F-16 विमानं सीमेवरून भारतात घुसखोरी करत होती.

मात्र सतर्क भारतीय वायूसेनेने हा हल्ला परतवून लावला.

यावेळी IAF च्या मिग-21 विमानाने पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं.

मात्र पाकिस्तानचं एफ-16 विमान भारताने पाडलंच नसल्याचा दावा पाकिस्तानने केला. अमेरिकेच्या ‘फॉरेन पॉलिसी’ या मॅगझिननेही पाकिस्तानच्या दाव्याला पुष्टी दिली.

त्यामुळे Indian Air Force ने यासंदर्भातील पुरावाच जाहीर केला आहे.

भारताचं MIG-21 विमान विंग कमांडर अभिनंदन वर्तमान चालवत असल्याची माहितीही भारतीय वायुसेनेने दिली आहे.

Exit mobile version