Tue. Dec 7th, 2021

पाकिस्तानशी वर्ल्ड कपमध्येही क्रिकेट खेळू नका – सुरेश बाफना

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या  दहशतवादी हल्ल्यामुळे संपुर्ण देशभरात शोककळा पसरली आहे.

यामुळे देशभरातून पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त होत आहे. यातच भारतीय किक्रेट संघाने पाकिस्तानसोबत सामना खेळू नये असे मत किक्रेट क्लब ऑफ इंडीयाचे सचिव सुरेश बाफना यांनी केले आहे.

काय म्हणाले बाफना ?

पाकिस्तानबरोबर नियोजित असलेला सामना खेळला जाऊ नये असे बाफना यांनी म्टटले आहे.

दरम्यान येत्या 16 जूनला ओल्ड ट्रॅफर्डमध्ये भारत आणि पाकिस्तान सामना खेळणार आहे.

CCI ही खेळाशी संबंधित संघटना आहे. मात्र खेळापेक्षा देश महत्वाचा आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कोणत्याच प्रकारचे स्पष्ट विधान केलेले नाही.

जर या हल्ल्यात  पाकिस्तानचा हात नाही तर ते अजून गप्प का आहेत असा प्रश्न बाफना यांनी विचारला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर CCI ने ब्रेबॉर्न स्टेडिअमच्या मुख्यालयात असलेला इम्रान खान यांचा फोटो झाकून टाकला आहे.

याचबरोबर मोहाली स्टेडियममधील सर्व पाकिस्तानी किक्रेटरचे पोस्टरही हटवण्यात आले आहेत.

याआधीही मुंबई बॉम्ब स्फोट हल्ल्यानंतर  पाकिस्तान सोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यात आली नव्हती.

यावर आता भारतीय किक्रेट संघ कोणती भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *