Thu. Nov 26th, 2020

पाकिस्तानी मालिका पाहणाऱ्या पत्नीवर हल्ला… हे ‘देशप्रेम’ की वेगळं काही?

A protester uses her phone to make a video of the proceedings during another night of protests over the police shooting of Keith Scott in Charlotte, North Carolina, U.S. September 24, 2016. REUTERS/Mike Blake - RTSPAT8

मोबाइलवर पाकिस्तानी टीव्ही मालिका पाहणाऱ्या पत्नीवर पतीने रागाने हल्ला केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. संतप्त पतीने कोयत्याने वार केल्यामुळे पत्नी जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर पतीला अटक करण्यात लंय.

प्राणांवर आलं, बोटांवर निभावलं…

पुण्यातील सलीसबारी पार्क भागात ही घटना घडली आहे.

या भागात राहणारे नर्गीस आणि आसिफ या पती पत्नींमधील वाद रक्तरंजीत झाला.

नर्गीस आणि आसिफ यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होते.

वारंवार भांडणं झाल्यामुळे दोघांनी एकमेकांशी बोलणंही बंद केलं होतं.

मात्र जेव्हा पती आसिफने नर्गीसशी बोलायचा प्रयत्न केला, तेव्हा नर्गीसने दुर्लक्ष केलं.

नर्गीस आपल्या मोबाइलवर पाकिस्तानी मालिका पाहू लागली.

या गोष्टीने आसिफला आणकी राग आला.

पाकिस्तानच्या मालिका का बघतेस, असा सवाल त्याने तिला केला.

पाकिस्तानी मालिका बघणं बंद कर आणि माझ्याशी बोल, असंही त्याने तिला सांगितलं.

मात्र त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत नर्गीस पाकिस्तानी मालिका बघत राहिली.

या गोष्टीने आसिफ संतापला.

त्याने पत्नीवर कोयत्याने वार केला.

या घटनेत पत्नी नर्गीस जखमी झाली.

तिच्या हाताचा अंगठाही तुटून पडला.

सुदैवाने तिचा जीव वाचला आहे.

पती-पत्नीमधील विसंवादाला अनेकदा मोबाइल कारणीभूत ठरतो.

मोबाइलवर पाकिस्तानी मालिका पाहणं हे पतीला रूचलं नसल्याने दोघांमध्ये खडाजंगी झाली.

पती आसिफ विरोधा स्वारगेट पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर आसिफला पोलिसांनी अटक केलंय. तर पत्नी नर्गीसवर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *