Jaimaharashtra news

पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल ?

नुकताच पाऊस सुरू झालाय, हवामानात मोठ्या प्रमाणात दमटपणा जाणवायला लागलाय. अशा वेळी आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची बरे ? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. कारण या रिमझिम बरसणाऱ्या वातावरणात जंतुसंसर्गाचा बऱ्याचदा धोका जाणवतो, शिवाय  दमट वातावरणामुळे त्वचा वारंवार ओलसर होेते.  कधीकधी अंगाला खाज येऊन आग व्हायला लागते. अशावेळी मात्र त्वचा कोरडी कशी राहील याकडे आपण लक्ष दिले पाहीजे.

जाणून घेवूया त्वचेची काळजी घेण्याबाबतच्या काही टिप्सः

कडूनिंबाची पाने 

औषधांमध्ये बहुगुणी असणाऱ्या कडुनिंबाचे फार मोठे महत्त्व आहे.  पावसाळ्यात त्वचेला वारंवार येणाऱ्या खाजेची दाहकता कडुनिंबाने कमी होते, म्हणून खाजऱ्या जागेवर कडुनिंबाच्या पानांची पेस्ट लावावी  म्हणजे आराम मिळतो.

मेथीचे दाणे

पावसाळ्यात कपडे भिजल्याने अंगाला खाज येऊन आग होण्याचे प्रकार वारंवार घडतात. तर अशावेळी मेथीच्या दाण्यांची पेस्ट करून खाजेच्या ठिकाणी लावली तर  खाज कमी होऊन आराम मिळतो.

कडूनिंबाचे पाणी

अंघोळीच्या गरम पाण्यात कडूनिंबाची पाने टाकून अंघोळ केल्यास त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

तिळाचे तेल 

तिळाचे तेल हे त्वचेसाठी खूपच गुणकारी आहे. अंघोळ करण्यापुर्वी जर तिळाच्या तेलाने मसाज केला तर त्वचा मुलायम राहते.

तुळस पेस्ट

तुळस ही औषधी आहे. तुळसकडूनिंब आणि पुदिन्याच्या पानांची एकत्र  पेस्ट त्वचे संबंधिच्या समस्या दूर करण्यास मदत करते.

 

Exit mobile version