Wed. Jun 19th, 2019

पावसाळ्यात मुंबईतील हे पूल बंद, मुंबईकरांचे हाल

0Shares

मुंबईत वारंवार होणाऱ्या पूल दुर्घटनेमुळे मुंबईतील 34 पूल महापालिकेने धोकादायक ठरवले आहेत. तर 29 पूल बंद ही केले आहेत तर या पैकी काही पूल बंद तर काही पूल तोडण्यात आले आहेत.पण आता ऐन पावसाळ्यात पूल बंद आल्यामुळे मुंबईकरांना पूल कोंडीला सामोरे जाव लागणार आहे.

पुल बंदी का होणार ?

सुरक्षेच्या कारणास्तव महापालिकेने मुंबईतील धोकादायक पूल बंद करण्यात आले आहेत.

29 पूल बंद केले असून 12 पूल बंद तर 9 पूल तोडण्यात ही आले आहेत.

पूल बंद असल्यामुळे पुलावरची सगळी वाहतूक इतर रस्त्यावर वळवण्यात आली आहे.

यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते पण त्याच बरोबर आता पावसाळ्यात मात्र  मुंबईकरांना  यामुळे सामोरे जाव लागणार आहे.

त्यात मुंबईत तुंबलेले पाणी  यामुळे होणारे ट्राफिक या सगळ्यांमुळे मुंबईकरांचे मोठे हाल होणार आहेत.

तोडण्यात आलेले पूल

– येलोगेट पादचारी पूल
– महर्षी कर्वे रोड, दक्षिणचर्निरोड जवळील पादचारी पूल
– महर्षी कर्वे रोड, चर्निरोड उत्तर
– वीर संभाजीनगर पूल मुलुंड
– खैराणी रोड वरील पूल
– बर्वेनगर पूल
– रेनिसन्स हॉटेल पूल पवइ

वापरासाठी बंद केलेले पूल

– हंसमुगरा मार्ग
– धोबिघाठ मज्जास नाला पूल
– वालभट्ट नाला गोरेगाव
– इराणीवाडी येथील पूल
– एसव्हीपी रोड पूल
– आकुर्लीरोड पूल
– गांधीनगर कुरार व्हिलेज पूल
– पिरामल नाला, लिंकरोड
– एस बी आय कॉलनी पूल
– दौलतनगर पूल
– लक्ष्मीबाग नाला घाटकोपर
– नीलकंठ नाला घाटकोपर

लवकरच बंद होणारे पूल

– मेघवाडी नाला पूल
– वांद्रे धरावी नाला पूल
– प्रेम नगर नाला मालाड
– ओशिवरा नाला
– 120 फूट नाला लिंक रॉड
– फॅक्टरीनगर नाला बोरिवली
-कन्नमवार नगर नाला

पावसाळ्यात मुंबईतील एकंदर वाहतुकीचा दरवर्षीचा अनुभव पाहता यंदा पूलबंदीमुळे मुंबईकरांचे अधिकच हाल होणार आहेत.

करी रोड, चिंचपोकळी, घाटकोपर, लोअर परळ, सायन, खार, विलेपार्ले अशा अनेक ठिकाणी रहदारीच्या पुलांचा वापर बंद किंवा मर्यादित केल्याने पावसाने जोर धरताच वाहतुकीचा बोजवारा उडण्याची भीती व्यक्त होत आहे.

मात्र मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पूल बंद केले असल्याचं महापालिकेचे म्हणणं आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: