Tue. Jun 18th, 2019

‘पुणेरी पाटी’ला टक्कर देतेय ही ‘ग्वाल्हेरी पाटी’!

146Shares

पुणेरी पाट्या या महाराष्ट्रभरात प्रसिद्ध आहेत. दरवाजे, गेट्सवर लावलेल्या थेट पण गमतीदार वाटणारा संदेश असणाऱ्या पाट्या केवळ पुण्याचीच मक्तेदारी न राहता आता चक्क ग्वाल्हेरमधील एक पाटी चांगलीच गाजतेय. निवडणुकीच्या प्रचाराची ही अनोखी तऱ्हा सगळीकडेच चर्चेचा विषय बनलीय.

काय लिहिलंय या पाटीवर ?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर BJP समर्थकांनी प्रचाराची हटके पद्धत शोधून काढली आहे.

ग्वाल्हेरनजिकच्या गावांमध्ये लोकांच्या दारात चक्क बेल बंद असल्याची पाटी लावली आहे.

गंमत म्हणजे, ‘डोअर बेल खराब झाली आहे त्यामुळे बेल वाजवण्याऐवजी ‘मोदी, मोदी’ असं ओरडा, म्हणजे आम्ही दरवाजा उघडू’ अशा आशयाची पाटी दरवाजावर लिहिण्यात आली आहे.

खरंतर एका मोदी समर्थकांच्या घराची Door Bell खरंच बिघडली होती.

तेव्हा त्याला ही संकल्पना सूचली.

मात्र या संकल्पनेला इतकी प्रसिद्धी मिळाली, की त्या परिसरातील अनेक मोदी समर्थकांनी हिच संकल्पना उचलून धरली.

सध्या इथे अनेक घरांच्या बाहेर अशाच पद्धतीची पाटी लावलेली पाहायला मिळतेय.

किमान 15 ते 20 घरांच्या बाहेर अशा स्वरूपाची पाटी लिहिली आहे.

आता केवळ ग्वाल्हेर परिसरच नाही, तर इतरही प्रदेशात अशा प्रकारची पाटील लिहिण्यात आली आहे.

अनेकदा दारांवर, किंवा घराबाहेर प्रचारासाठी आलेले नेते मंडळी, समर्थक आपले स्टिकर, पोस्टर लावून जातात.

पण घरातल्याच लोकांनी अशा प्रकारे प्रचार करण्याची मोदी समर्थकांची पद्धत अजबच म्हणावी लागेल.

हे पोस्टर एवढं प्रसिद्ध झालंय, की आता बाकीच्या ठिकाणीही लोक copy करू लागले आहेत.

146Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *