Tue. Oct 19th, 2021

पुण्याच्या धडक कारवाईत 232 कोयते जप्त!

पुणे शहरात कोयत्याने वार करून खून, मारामाऱ्या होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अखेर पोलिसांना आता जाग आली आहे. शहरातील जुना बाजार परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करून तब्बल 232 कोयते जप्त केले आहेत. या कारवाईच्या वेळी पोलिसांनी 5 कोयते विक्रेत्यांनाही अटक केलंय. त्यांच्यावर आर्म ऍक्टनुसार कारवाई केली आहे.

अटक आरोपींची नावं

जयसिंग शामराव पवार

निलेश तानाजी साळुंखे

दिनेश सुखलाल साळुंखे

फकरुद्दीन जैनुद्दीन लोखंडवाला

कासीम नमुद्दीन छावणीवाला

हे ही वाचा- पुण्यात खूनी सत्र : 15 दिवसांत 13 हत्या !

शस्त्रास्त्रं कायद्याचं सर्रास उल्लंघन

शस्त्रास्त्रं कायद्यान्वये ठराविक आकारापेक्षा मोठे कोयते विकता येत नाहीत.

परंतु, मंगळवार पेठेतील जुना बाजार परिसरात बंदी असलेले कोयते सर्रासपणे विकले जातात.

रविवारी आणि बुधवारी भरणाऱ्या बाजारात ही शस्त्रास्त्रं सहज उपलब्ध होत आहेत.

पुणे शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.

हाणामारी, गंभीर दुखापत करणं, खुनाचा प्रयत्न अशा घटनांमध्ये कोयत्याचा सर्रास वापर होऊ लागलाय.

शहरातील दत्तवाडी अलंकार सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या खुनाच्या घटनेमध्ये कोयत्‍याचाच वापर करण्यात आला होता.

यातील आरोपींकडे विचारणा केली असता त्यांनी जुना बाजारातून कोयते खरेदी केल्याची दिली होती.

त्यानंतर पोलिसांनी जुना बाजारातील 5 दुकानांवर धाड टाकून विक्रीसाठी ठेवलेले तब्बल 232 कोयते आणि सत्तूर जप्त केले.

नवं वर्षं, पहिला महिना… 13 हत्या!

पुणे शहरात जानेवारी महिन्यामध्ये तब्बल 13 जणांची हत्या करण्यात आलेली आहे.

त्यामध्ये तीक्ष्ण हत्याराने हत्या केल्याची संख्या जास्त आहे.

त्यामुळे ‘विद्येचं माहेरघर’ समजल्या जाणार्‍या पुणे शहराला आता गुन्हेगारीचं ग्रहण लागलंय.

आता पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे तरी पुण्यातली गुन्हेगारी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *