पुण्यात घडला थरारक अपघात
जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
रस्ता ओलांडताना बघूनच ओलांडा असं अनेकदा सांगितलं जाते. पण भरधाव कारच तुमच्या अंगावर आली तर काय करणार अशीच दुर्देवी घटना घडलीय ती पुण्याच्या बाणेरमध्ये.
बाणेरमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दोन मुलांचा भरधाव कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही दोनही मुलं आईसोबत डी मार्टमधून खरेदी करुन घरी परतत होती. पण, रस्त्याच्या दुभाजकावरट भरधाव आलेल्या कारनं या कुटुंबाला धडक दिली.
यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. तर, मुलांची आई मात्र गंभीर जखमी झाली. ही भरधाव कार एक महिला चालवत होती. ती एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी असल्याचं सांगितलं जात आहे.
thank you so much for this impressive internet site me and my phratr preferent this self-complacent and perceptiveness