पुण्यामध्ये गाजतेय उन्हाळा स्पेशल ‘Ice Cream थाळी’!

उन्हाळा म्हटलं की, सूर्याचे तळपते रूप आणि सर्वत्र उन्हाचा तडाखा पाहायला मिळतो. मात्र, गरम वातावरणात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना अल्हाददायक थंडावा देणारा पदार्थ म्हणजे आईसक्रीम.
ऋतू कुठलाही असो, आईसक्रीमला नाही म्हणाणाऱ्या व्यक्ती क्वचितच सापडतील.
‘किगा आईसक्रीम पार्लर’ हे येथील प्रसिद्ध आईसक्रीम पार्लर आहे.
येथे आईसक्रीम खवय्यांसाठी चक्क ‘आईसक्रीम थाळी’च सुरू झाली आहे.
पुण्यातील बाजीराव रस्त्यावर मागील चार ते पाच महिन्यांपासून हे आईसक्रीम पार्लर खवय्यांच्या सेवेत आहे.
या पार्लरचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे येथे मिळणारी ‘आईस्क्रीम थाळी’ त्यात ‘पेशवाई थाळी’, ‘क्लासिक थाळी’, ‘बाळराजे थाळी’, ‘चॉकलेट थाळी’ आणि ‘उपवास थाळी’ असे थाळीचे पाच प्रकार येथे चाखायला मिळतात.
मस्तानी, स्पेशल ड्रायफ्रुटस या वेगवेगळ्या फ्लेव्हर्समध्येही आईस्क्रीम चाखायला मिळतात.सध्या याच थाळीची चर्चा पुणे शहरात पाहायला मिळतेय.